Tuesday, May 5, 2026
HomeनगरAhilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग रचनेवर 13 एप्रिलपर्यंत हरकती घेण्यात येवून त्यावर सुनावणी घेवून या ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना सोमवार (दि.4 मे) रोजी जाहीर करण्यात आली आहे. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आरक्षणाकडे नजरा लागला आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोग लवकरच या ठिकाणचे आरक्षण जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

- Advertisement -

जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत 771 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यात 771 ग्रामपंचायतींपैकी 618 ग्रामपंचायतींवर एकही हरकत दाखल नव्हती. तर 153 ग्रामपंचायतींवर 384 हरकती दाखल झाल्या होत्या. यावर एप्रिल महिन्यांत अंतिम सुनावणी घेवून सोमवार (दि.4) रोजी त्या ठिकाणची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, मुदत संपणार्‍या या ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम आता अंतिम झाल्याने आता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी या ठिकाणचे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत असणारे हे आरक्षण राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने काल सोमवारी प्रभाग रचना अंतिम करून त्याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेली आहे. लवकरच राज्य निवडणूक आयोग मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.

या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर
अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, राहाता 25, नगर 59, श्रीरामपूर 27, राहुरी 44, नेवासा 59, पाथर्डी 79, शेवगाव 48, कर्जत 56, जामखेड 49, पारनेर 88 आणि श्रीगोंदा 62 यांचा समावेश आहे.

आता निवडणुका दिवाळीनंतरच ?
नगर जिल्ह्यातील 771 ग्रामपंचायतींची चालू वर्षी मुदत संपणार आहे. या ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना अंतिम करण्यात आलेला आहे. लवकरच आरक्षण कार्यक्रम जाहीर होणार आहे. हा आरक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांपासून अधिकचा कालावधी लागणार आहे. शिवाय पुढील 125 दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात निवडणूका घेत येत नसल्याने आता मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींसफाठी पावसाळ्यानंतर निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एकाच दिवशी रोखले 10 बालविवाह

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात 11 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित...