Sunday, June 14, 2026
Homeक्राईमAhilyanagar : ग्रामसेवकाला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी

Ahilyanagar : ग्रामसेवकाला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी

गावातील विरोधकांचे ऐकून काम केले असल्याचा राग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ग्रामसेवकाला उघडपणे बंदूकदाखवून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शहरातील संदीप हॉटेलसमोर घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप संजय मिसाळ (वय 39, ग्रामपंचायत अधिकारी, पिंगेवाडी, ता. शेवगाव, मूळ रा. कर्‍हेटाकळी, ता. शेवगाव) हे दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास संदीप हॉटेलच्या मुख्य दरवाज्याजवळ उभे होते.

- Advertisement -

त्यावेळी संशयित आरोपी अमोल चंद्रकांत गवळी (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) हा तेथे आला. गवळी याने फिर्यादीस धमकावत म्हणाले, ए ग्रामसेवका, इकडे बघ माझ्याजवळ बंदूक आहे. या सहा गोळ्या घालीन. तू आमच्या विरोधकांचे ऐकून काम करत होतास. आमचे नेते आता खासदार झाले आहेत. आम्ही आमच्या विरोधकांची आणि तुझी गाठ घेणार आहोत. असे म्हणत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी ग्रामसेवक मिसाळ यांनी दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अमोल गवळी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत आहेत.

नेत्यांच्या नावावर दहशत
मिसाळ यांना धमकी देताना गवळी याने आमचे नेते आता खासदार झाले आहेत. आम्ही आमच्या विरोधकांची आणि तुझी गाठ घेणार आहोत. असे म्हणत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. नेते आणि खासदार हे शब्द गवळी याच्या तोंडून आले असल्याने विद्यमान खासदाराच्या नावाचा धमकीसाठी उपयोग केला गेला असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...