संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आजोबानेच (Grandfather) अल्पवयीन नातीवर (Minor Granddaughter) बलात्कार (Rape) केल्याने ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी (Sangamner Taluka Police) पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की आरोपी आजोबाने आपल्या 13 वर्ष 1 महिना 18 दिवस वय असलेल्या अल्पवयीन नातीवर अत्याचार (Minor Granddaughter Rape) केला. त्यामुळे ती तब्बल पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. यामुळे नात्याला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून पीडित मुलीच्या आईने तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन आजोबासह इतर चौघांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, मुख्य आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.





