Friday, May 3, 2024
Homeनाशिकद्राक्ष महोत्सवास प्रारंभ

द्राक्ष महोत्सवास प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पर्यटन संचलनालय नाशिक विभाग (Directorate of Tourism Nashik Division )आयोजित नाशिक द्राक्ष महोत्सवाचे (Nashik Grape Festival )आयोजन ग्रेप पार्क रिसॉर्ट (Grape Park Resort )येथे करण्यात आले. या द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन नाशिकचे खासदार हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी वाइन प्रोड्युसर असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर, सुला वाईनचे उपाध्यक्ष संजय पैठणकर, सोमा वायनरीचे प्रदीप पाचपाटील आणि तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांसह संचालनालय नाशिक विभागाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई राठोड यांच्या हस्ते अनोख्या पद्धतीने द्राक्षाच्या वेलाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांचे स्वागत उपसंचालक सरदेसाई यांच्या हस्ते झाले.

द्राक्ष महोत्सवाचे आयोजन हे नाशिककर शेतकर्‍यांना द्राक्ष उत्पादनाशी निगडित असलेल्या इतर व्यावसायिकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची आणि पर्यटन विभागामार्फत नाशिकच्या पर्यटन वृद्धीसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करील खासदार हेमंत गोडसे यांनी द्राक्ष महोत्सवाच्या आयोजकांना देऊन वेळोवेळी आयोजित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी होळकर, पाचपाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी या द्राक्ष महोत्सवांत बीड जिल्ह्यातील उत्पादकांनी आपले स्टॉल थाटून वाईन उद्योगाची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच नाशिक जिल्ह्यात विविध प्रकारच्या द्राक्षांची उत्पादने घेतली जातात. या द्राक्षांच्या गोडवा जसा महत्त्वाचा असतो तसाच त्याचा रंग, आकार प्रत्येक द्राक्षाच्या मन्याचे मोजमाप देखील महत्त्वाचे असल्याने त्यांची देखील द्राक्ष उत्पादकांमधील स्पर्धा आयोजित करून द्राक्ष उत्पादकांना प्रेरणादायी ठरेल असे प्रदर्शन आणि मांडण्यात आले होते. याची पाहणी खा. हेमंत गोडसे यांनी केली.

द्राक्ष उत्पादक जगदीश होळकर यांनी त्यांना माहिती दिली. या द्राक्ष महोत्सवात विविध उपक्रम राबविताना नाशिककरांना आकर्षित करण्यासाठी जयदीप आलम चंदानी यांनी विंटेज कार ही दर्शनी भागात लावल्यामुळे ती एक आकर्षण ठरलेी होतीे. या विंटेज कार विषयी जयदीप कलम चंदानी यांनी अधिक माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी म्हणून व्यासपीठावर बासरी वादनाने उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला.

या प्रदर्शनाच्या योजनाविषयी उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी अधिक माहिती दिली.त्यांनी सांगितले की, नाशिक हे भारतातील वाईन कॅपिटल ( Wine Capital ) म्हणून ओळखले जाते. कारण येथे मोठ्या प्रमाणात वाईनरीज आहेत आणि हा देशातील प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्टा आहे. त्यांचे ब्रँण्डींग व्हावे. वामची ओळख व्हावी, या हेतुने हे प्रदर्शन भरवले. दोन दिवसांत साधारण चार हजार लोक भेट देतीेल, अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या