Friday, May 3, 2024
Homeनाशिकएबीबी कंपनीला ‘ग्रीन फॅक्टरी बिल्डिंग’ पुरस्कार

एबीबी कंपनीला ‘ग्रीन फॅक्टरी बिल्डिंग’ पुरस्कार

सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

सातपूर औद्योगिक क्षेत्रातील एबीबी इंडिया कंपनीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्लँट दोनला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिल (आयजीबीसी) ‘ग्रीन फॅक्टरी बिल्डिंग’ सर्टिफिकेशन देऊन नुकताच गौरव करण्यात आला.

- Advertisement -

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत ऊर्जेचे प्रवाही प्रेरणास्रोत पुरविण्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन जपणारा उद्योग म्हणून या मानांकनामुळे कंपनीचा वेगळा ठसा निर्माण झाला आहे.

आयजीबीसीतर्फे ‘ग्रीन फॅक्टरी बिल्डिंग’ हा भारतात विकसित करण्यात आलेला केवळ औद्योगिक क्षेत्रासाठीचा पहिला मानांकन आहे. तो जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ऊर्जा व पर्यावरण विषयक तत्त्वांवर आधारित आहे.

कंपनीच्या उभारणीत नैसर्गिक संसाधनांच्या वापरावर नियोजन करण्यात आले होते. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, नैसर्गिक प्रकाशाचा परिणामकारक वापर, कार्यक्षम व्हेंटिलेशन व सौरऊर्जेचा वापर यातून एकत्रितपणे 95.03 टक्के पारंपरिक ऊर्जा वापराची बचत व वार्षिक कार्बन उत्सर्जन 345 टनांनी कमी करण्यात कंपनीने यश मिळवले आहे.

कारखान्यातील सेवकांच्या स्वास्थ्यवर्धनासाठी उपलब्ध केलेली विविध व्यायाम उपकरणे, वृक्षारोपण, प्रॉडक्ट पॅकेजिंगमध्ये केलेला कमीत व कमी प्लास्टिकचा वापर इत्यादी पूरक उपाय योजनांचा वापर या बाबी हे प्रमाणपत्र मिळविण्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

या कारखान्यातून ‘इंडस्ट्री 4.0’ मानांकनानुसार विविध उत्पादनांची 120 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. हे प्रमाणपत्र आमच्या शाश्वत प्रयत्नांचा आयजीबीसीतर्फे झालेला गौरव आहे. आमच्यासाठी तो अभिमानास्पद आहे. पर्यावरणपूरक औद्योगिक बांधकाम, संरचना निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

गणेश कोठावदे, वरिष्ठ उपाध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या