Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारकिराणा दुकान फोडणार्‍यास अवघ्या ४ तासात अटक

किराणा दुकान फोडणार्‍यास अवघ्या ४ तासात अटक

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरातील किराणा दुकान फोडणार्‍या आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या ४ तासात आवळल्या असुन.चोरीचा ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मंगळ बाजार परिसरातील टिलुमल वेडुमल नावाच्या किराणा दुकानाचे शटरचे कुलुप अज्ञात चोरट्यांनी तोडुन दि. २ रोजी दुकानात प्रवेश करुन दुकानातील ५८ हजार ५८ रुपयांचा किराणा माल चोरुन नेला होता.याबाबत अज्ञात आरोपीताविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक स्वतंत्र पथक नंदुरबार शहरात रवाना केले व स्वत:ही आपल्या बातमीदारांमार्फत व जेलमधुन सुटुन आलेले व पॅरोल रजेवर आलेल्या मालमत्तेविरुध्दच्या गुन्हेगारांची माहिती काढत होते.

त्या दरम्यान असे लक्षात आले की, नंदुरबार शहरातील सराईत गुन्हेगार ज्याच्यावर मालमत्ते विरुध्दचे सुमारे १५ ते २० गुन्हे दाखल असुन तो नुकताच जेलमधुन सुटुन आलेला आहे व त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने, पथकाने संशयीत आरोपी संतोष दिलीप तिजविज रा. बाहेरपुरा, नंदुरबार यास गांधी पुतळा परीसरातुन सापळा रचुन ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी संशयीत आरोपीतास स्वत: विचारपुस करण्यास सुरुवात केली व खोटे बोलण्यात पटाईत असलेल्या सराईत गुन्हेगारास आपल्या कौशल्यपुर्ण तपास पध्द्तीने विचारपुस करुन संशयीत आरोपीतास त्याच्या बोलण्यातच अडकवुन खरे बोलण्यास भाग पाडले.

आता आपण पुर्णपणे आपल्यास बोलण्यात अडकल्याचे आरोपीताच्या लक्षात आल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे मान्य करुन चोरी केलेला किराणा माल नंदुरबार शहरातील सिटी पार्क परिसरातील शांतीरत्न बंगल्या समोरील जुनी पडकी विहीरीच्या भिंतीच्या आडोश्याला लपवून ठेवल्याबाबत सांगितल्याने पथकाने त्याठिकाणी जावुन गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन संशयीत आरोपी संतोष दिलीप तिजविज यास मुद्देमालासह नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी विरूध्द याच्यावर नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे २० मालमत्ते विरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगारास गुन्हा घडल्यापासुन अवघ्या ४ तासाच्या आत ताब्यात घेवुन गुन्हा उघडकिस आणला

.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, पोलीस नाईक राकेश नानाभाऊ मोरे, दादाभाई मासुळ, पोलीस शिपाई अभय राजपुत, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या