Friday, July 24, 2026
HomeनगरAhilyanagar : भूगर्भातील पाणी आणखी खोलात; दीड मीटरने भूजल पातळी घटली

Ahilyanagar : भूगर्भातील पाणी आणखी खोलात; दीड मीटरने भूजल पातळी घटली

पाणी टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला असला तरी यंदा जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षाच्या तुलनेतील सरासरीपेक्षा 1.67 मीटरने अधिक घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या मे महिन्यात जिल्ह्याला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मार्च महिन्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये तब्बल 7.87 मीटरने भूजलपातळी घटली आहे. जिल्ह्यात सरासरी 448.6 मिमी पावसाची नोंद होते. मात्र, गेल्यावर्षी सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला होता.

- Advertisement -

तब्बल 664 मिमी पावसाची झाला. मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात 202 निरीक्षण विहिरींच्या अहवालानुसार जिल्ह्याची भूजल पातळी घटल्याचे म्हटले आहे. ऑक्टोबर 2025 मधील सर्वेंक्षणात भूजल पातळीत वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्यात त्यात मोठी घट झाली. ऑक्टोबर 2025 मध्ये भूजलपातळी 0.90 मीटरने वाढली होती. वाढत्या पाण्याचा उपश्यामुळे तसेच दिवसेंदिवस सुर्य आग ओकत असल्याने भूजलपातळी झपाट्याने कमी होत आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 202 निरीक्षण विहिरी आहेत. या विहिरीच्या माध्यमातून भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. ही भूजल पातळीची मागील पाच वर्षाच्या मार्च महिन्यामधील सरासरी तुलनात्मक स्थिती विचारात घेऊन यंदाच्या मार्च 2026 ची भूजल पातळी निश्चित करण्यात येते. त्याआधारे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. मार्च महिन्यात पातळी खालावल्याने एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तलाव, विहिरींच्या पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई आता अधिक भासू लागली आहे. येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू शकते.

ऑक्टोबरमध्ये भूजल पातळीत वाढ
ऑक्टोबर 2025 मधील सर्वेक्षणानुसार भूजल पातळीमध्ये वाढ झाली होती. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (आकडे मीटरमध्ये) अकोले 0.44, जामखेड 1.30, कर्जत 0.24, कोपरगाव 1.11, नगर 1.03, नेवासा 0.58, पारनेर 0.82, पाथर्डी 3.08, राहाता 0.35, राहुरी 0.79, संगमनेर 1.04, शेवगाव 1.64, श्रीगोंदा 0.90, श्रीरामपूर 0.90.

सहा तालुक्यांतील घट अधिक
ऑक्टोबर 2025 नंतर सहाच महिन्याने मार्च 2026 मधील सर्वेक्षणात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.(आकडे मीटरमध्ये) अकोले 1.38, जामखेड 2.00, कर्जत 1.40, कोपरगाव 1.76, नगर 1.85, नेवासा 1.80, पारनेर 1.87, पाथर्डी 1.05, राहाता 1.84, राहुरी 1.59, संगमनेर 1.82, शेवगाव 1.82, श्रीगोंदा 1.60, श्रीरामपूर 1.65. जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहाता, संगमनेर व शेवगाव या सहा तालुक्यांत भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. तर मार्चमधील सर्वेक्षणात सर्वाधिक कोपरगाव तालुक्यात 9.43 मीटरने भूजल पातळी घटली. सरासरी 1.76 मीटरची घट आहे.

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...