अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेतकर्यांच्या कर्जमाफीसंदर्भात आ. रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावर बोलतांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. रोहित पवारांचं का मनावर घेतात हे कळत नाही. खरंतर त्यांची ही लढाई शेतकर्यांसाठी नाही, तर स्वतःच अस्तित्व दाखवून देण्यासाठी असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.
नगरमध्ये माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकर्यांना 35 हजार कोटींची कर्ज माफी करत धाडसी निर्णय केलेला आहे. आता त्याच्या अंमलबजावणीत येणार्या अडचणी सरकार सोडवेल. खरे या या सरकारने आंदोलन न करता शेतकर्यांना ही कर्जमाफी दिलेली असल्याचे विखे पाटील म्हणाले. नगरच्या सीना नदीतील अस्वच्छता अतिक्रमण यावर बोलतांना विखे पाटील म्हणाले, शहरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सीन नदीसह अहिल्यानगर शहरातील नाले स्वच्छ केली जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
खासगी कोचिंग क्लासेसच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी नियमावली तयार करणे आवश्यक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. शेतकर्यांच्या कर्जमाफीसंदर्भात आ. पवार यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावर बोलतांना पालकमंत्री विखे पाटील यांनी आ. रोहित पवारांचं का मनावर घेतात हे कळत नाही. खरंतर त्यांची ही लढाई शेतकर्यांसाठी नाही, तर स्वतःच अस्तित्व दाखवून देण्यासाठी असल्याची टीका केली.




