Friday, May 3, 2024
HomeनाशिकPhotoGallery : नाशिकमध्ये पारंपारीक पद्धतीने गुढीपाडवा साजरा

PhotoGallery : नाशिकमध्ये पारंपारीक पद्धतीने गुढीपाडवा साजरा

नाशिक | Nashik

नाशकात करोनाच्या सावटाखाली गुढीपाडवा सण पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला.

- Advertisement -

गुढीपाडवा अर्थात हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस साजरा होत आहे. हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो. घरात पुरणाची पोळी, नवनवीन वस्तूंची खरेदी आणि आनंदाचे वातावरण असते. मात्र, यंदाच्या गुढी पाडव्यावर करोनाचं सावट आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात सध्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

राज्य सरकारने राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. त्या, पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे, करोनाचं सावट यंदाच्या गुढी पाडव्याच्या सणावरही आहे.

त्यानुसार, कुठलीही मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली असून घरीच हा सण साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्यानुसार आज शहरात गुढीपाडवा साजरा होत आहे.

अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो. विशेष म्हणजे पालखी, दिंडी, प्रभार फेरी, बाईक रॅली व मिरवणूक काढण्यात येतात. मात्र, यंदाच्या वर्षी या सर्वांनाच बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या