Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशगॅस गळती झाल्याने ६ जणांचा मृत्यू; २५ जणांची प्रकृती चिंताजनक

गॅस गळती झाल्याने ६ जणांचा मृत्यू; २५ जणांची प्रकृती चिंताजनक

दिल्ली | Delhi

- Advertisement -

गुजरातमधील (Gujarat) सूरतमध्ये (Surat) गुरुवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. सूरतमधील सचिन परिसरात (Sachin GIDC) असलेल्या एका प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधून गॅस गळती (gas leakage) झाल्याने मिलमधील तब्बल…

६ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सध्या सर्व बाधितांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीजवळ असणाऱ्या नाल्यात एक टँकर चालक केमिकल टाकत होता. तेव्हा त्यामधून विषारी वायुची गळती सुरु झाली. यामध्ये प्रिंटिंग मिलच्या कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. विषारी गॅसबाबत समजेपर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला तर २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

दरम्यान या आधी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कपड्याच्या कारखान्यात रासायनिक कचरा टाकी साफ करताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादच्या ढोलका येथील चिरीपाल ग्रुपच्या विशाल फॅब्रिक युनिटमध्ये हा अपघात झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या