Friday, September 20, 2024
Homeक्राईमकारमधून गुटख्याची वाहतूक करताना पकडले

कारमधून गुटख्याची वाहतूक करताना पकडले

श्रीरामपूरच्या एकासह तिघांवर गुन्हा || साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

कारमधून गुटखा वाहतूक करणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डी तालुक्यात पकडले. त्याच्या ताब्यातून कार व गुटखा असा तीन लाख 37 हजार 815 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाजी मारूती बटुळे (वय 40 रा. भारजवाडी ता. पाथर्डी) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याने परवेज नवाब शेख (रा. श्रीरामपूर) व संजय खोले (पूर्ण नाव नाही, रा. बोधेगाव ता. शेवगाव) यांच्याकडून गुटखा खरेदी केल्याची कबुली दिली आहे. तिघांविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार किशोर शिरसाठ, संतोष लोंढे, बाळु खेडकर यांचे पथक पाथर्डी तालुक्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी गस्त घालत असताना शिवाजी बटुळे हा गुटखाची विक्री करण्यासाठी खरवंडीवरून पाथर्डीकडे वाहतूक करत असल्याची माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कळवून खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या