Tuesday, May 5, 2026
Homeक्राईमCrime News : गुटखा तस्करीवर कोतवाली पोलिसांची कारवाई; एकास पकडले

Crime News : गुटखा तस्करीवर कोतवाली पोलिसांची कारवाई; एकास पकडले

सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गुटखा व सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या व्यक्तीला कोतवाली पोलिसांनी गुरूवारी (2 ऑक्टोबर) पहाटे सापळा रचून वाहनासह ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 3 लाख 13 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुरूवारी पहाटे 5 वाजता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माहिती मिळाली की, एका काळ्या रंगाच्या कारमधून गुटख्याचा साठा शहरात आणला जाणार आहे. त्यानुसार त्यांनी दिलेल्या आदेशावरून पोलिसांनी सापळा लावला असता दीपक पोपटराव लोखंडे (रा. अहिल्यानगर) हा व्यक्ती कार (एमएच 16 एबी 3851) मध्ये गुटखा घेऊन येताना सापडला. पोलिसांनी केलेल्या तपासणीत वाहनातून 1 लाख 40 हजार रूपये किमतीचा गुटखा, 17 हजार 600 रूपये किमतीची तंबाखूसह एकुण 3 लाख 13 हजार 400 रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी दीपक लोखंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक गायकवाड, अन्न प्रशासनाचे निरीक्षक राजेश बडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश देशमुख व प्रवीण पाटील, अंमलदार संतोष बनकर, सुनील शिरसाठ, विजय ठोंबरे, सुरज कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, दीपक रोहकले, याकुब सय्यद, संदीप कवळे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...