Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र'या' तारखेपासून उघडणार व्यायामशाळा, फिटनेस सेंटर

‘या’ तारखेपासून उघडणार व्यायामशाळा, फिटनेस सेंटर

मुंबई : Mumbai

करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉक अंतर्गत बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु केल्या जात आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर बंद होते.

- Advertisement -

यामुळे मागच्या महिन्याभरापासून राज्यामध्ये जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी जोर धरला होता. राज्य सरकारने आज अखेर ही मागणी मान्य केली असून राज्यात येत्या २५ ऑक्टोबरपासून व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर उघडण्याची परवानगी दिली आहे.

तसेच करोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच जिम, व्यायामशाळांना परवानगी मिळावी, यासाठी या संघटनेच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेंच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आहे.

दरम्यान त्यांनी राज्यातील व्यायामशाळा उघडण्यास परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या