Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजHafiz Saeed : हाफिज सईदचा साथीदार गोळीबारात ठार; जम्मू-काश्मीरमध्ये केला होता दहशतवादी...

Hafiz Saeed : हाफिज सईदचा साथीदार गोळीबारात ठार; जम्मू-काश्मीरमध्ये केला होता दहशतवादी हल्ला

सईद हल्ल्यात जखमी

नवी दिल्ली | New Delhi

लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेतील क्रूरकर्मा अबू कताल (Abu Qatal) उर्फ कताल सिंघी हा शनिवारी (१५ मार्च) रात्री पाकिस्तानमध्ये (Pakistan) एका हल्ल्यात (Attack) ठार झाला आहे. कताल हा जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. तसेच तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेमधील महत्त्वाचा ऑपरेटिव्ह होता. कताल हा २६/११ च्या मुंबईवरील (Mumbai) दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा साथीदार होता. तर हाफिज सईद गोळीबारात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

अबू कताल उर्फ कताल सिंघी याच्या हत्येने पाकिस्तानात (Pakistan) खळबळ उडाली आहे. मागील काही काळापासून पाकिस्तानात लपून बसलेल्या भारताच्या शत्रूंची अशाच पद्धतीने हत्या सुरू आहेत.अबू कताल हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून जम्मू काश्मीरात सातत्याने हल्ल्यांचे कट रचत होता. इतकेच नाही तर हाफिज सईदने जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची जबाबदारी अबू कतालला दिली होती. हाफिजने त्या लश्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवले होते. हाफिजकडूनच त्याला आदेश मिळायचे यानंतर तो काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांची अंमलबजावणी करत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जून महिन्यात रियासीतील शिवखोडी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर (Devotees) हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कताल सिंघी हाच होता. तसेच काश्मीरातील (Kashmir) अनेक हल्ल्यांमागेही अबू कताल असल्याचे सांगितले जाते. २०२३ मधील राजौरी हल्ल्यात देखील अबू कतालचा हात असल्याचे एनआयएने (National Investigation Agency) म्हटले होते.

हाफिज सईद मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड

हाफिज सईद २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो.या हल्ल्यात १६० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. २००६ साली मुंबईत झालेल्या ट्रेन बॉम्बस्फोटात सुद्धा हाफिज सईदचा हात होता. तर २००१ साली भारतीय संसदेवर सुद्धा सईदने हल्ला केला होता. तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत (List) होता. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला आमच्याकडे सोपवा असे भारताने पाकिस्तानला सांगितले होते. परंतु, पाकिस्तान त्याला दहशतवादी म्हणून मान्य करायला तयार नव्हता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...