पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील हंगा (Hanga) गावातील साठे वस्तीवर रविवारी (दि.26) पहाटे 2.30 च्या सुमारास दरोडेखोरांनी (Robber) धुमाकूळ घालत बापलेकाला कोयता, लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करत घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा 7 लाख 42 हजारांचा ऐवज लूटून (Robbery) नेला आहे. तर मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हंगा शिवारात साठे वस्तीवर जालिंदर विश्वनाथ साठे (वय 35) यांच्या घरात रविवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी हातात कोयते, लोखंडी रॉडसह घरात घुसले. तसेच जालिंदर साठे व त्यांचे वडील विश्वनाथ साठे यांना मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवत घरातील सोन्या चांदीचे दागिने (Gold Jewelry) तसेच रोकडसह 7 लाख 42 हजारांचा ऐवज लूटून नेला. यावेळी केलेल्या मारहाणीत जालिंदर साठे व त्यांचे वडील विश्वनाथ साठे हे दोघे जखमी (Injured) झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे (Supa Police Station) सहाय्यक पोलीस निरिक्षक दिवटे हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपत भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या आहेत.