Saturday, November 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपाणी, चारा नियोजनाला प्राधान्य द्या - मंत्री छगन भुजबळ यांचे अधिकार्‍यांना निर्देश

पाणी, चारा नियोजनाला प्राधान्य द्या – मंत्री छगन भुजबळ यांचे अधिकार्‍यांना निर्देश

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

पावसाची तूट आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करून सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

येवला येथील संपर्क कार्यालयात मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा. विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार अधिग्रहण करावे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा नियमित आढावा घेऊन गरजेनुसार टँकरची व्यवस्था करावी, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, पशुपालक आणि मेंढपाळांना दिलासा देण्यासाठी चारा उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत येवला व ३८ गावे, राजापूर व ४० गावे, धुळगाव व १६ गावे तसेच विंचूर-लासलगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

वीज, घरकुल, रस्त्यांच्या कामांचाही आढावा
पाणीपुरवठ्याबरोबरच नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती, लासलगावमधील घरकुल योजना, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा, चौपदरी व काँक्रीट रस्त्यांची कामे तसेच शिव नदी आणि लोणगंगा नदी संवर्धन योजनांवर बैठकीत चर्चा झाली. सर्व विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.

ताज्या बातम्या

IND vs NZ 1st Test : वेलिंग्टन कसोटीत भारत मजबूत स्थितीत;...

0
नवी दिल्ली | New Delhi भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या...