Hardik Pandya And Arshdeep Singh IPL Trade : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्यातील ट्रेडला दुजोरा मिळाला आहे. आयपीएलने बुधवारी (11 नोव्हेंबर) या ट्रेडबाबत अधिकृत माहिती दिली. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल 2027 मध्ये पंजाब किंग्सकडून (PBKS IPL) खेळेल, तर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसेल. हार्दिक एमआयचा कर्णधार होता. दुसरीकडे अर्शदीप बर्याच काळापासून पंजाब संघाचा भाग होता. मात्र या दोघांच्या ट्रेडच्या बातम्या बर्याच काळापासून पसरत होत्या.
आयपीएल 2027 (IPL 2027) च्या हंगामापूर्वी हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये सामील झाल्यानंतर, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्या या प्रवासाचे स्मरण करून देणारा एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणार्या या संघाने, हार्दिकच्या योगदानाबद्दल आणि त्याच्यासोबतच्या अविस्मरणीय क्षणांबद्दल त्याचे आभार मानले आहेत. 18 कोटी रुपयांच्या या मोठ्या ट्रेड (खेळाडूंची अदलाबदल) (IPL Trade) करारामुळे मुंबई इंडियन्ससोबतचा हार्दिकचा दुसरा कार्यकाळ आता संपला आहे. याआधी त्याने मुंबई इंडियन्ससोबत चार आयपीएल जेतेपदे जिंकली होती. आयपीएल 2027 च्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये सामील झाल्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याला एक भावूक निरोप देते त्याचं संघासाठीचं योगदान अधोरेखित केलं आहे.
या ट्रेडमध्ये हार्दिकला त्याच्या सध्याच्या मानधनापेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. अर्शदीप त्याच्या सध्याच्या मानधनावर मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. हार्दिक 18 कोटी रुपयांच्या मानधनावर पंजाब किंग्समध्ये सामील झाला होता, तर मागील हंगामात, म्हणजेच आयपीएल 2026 मध्ये, तो 16.5 कोटी मानधनावर पंजाबमध्ये होता. अर्शदीप 18 कोटी मानधनावर मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला.




