Wednesday, November 11, 2026
Homeक्रीडामुंबई इंडियन्सला रामराम! हार्दिक पांड्या पंजाब किंग्जमध्ये दाखल; पहिल्याच पोस्टने चर्चेला उधाण

मुंबई इंडियन्सला रामराम! हार्दिक पांड्या पंजाब किंग्जमध्ये दाखल; पहिल्याच पोस्टने चर्चेला उधाण

मुंबई | Mumbai
आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी क्रिकेटविश्वात मोठी उलथापालथ झाली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आता पंजाब किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला आहे. हार्दिकच्या बदल्यात पंजाबने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मुंबई इंडियन्सकडे पाठवले आहे. नव्या संघात प्रवेश करताच हार्दिकने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्याने श्रेयस अय्यर हाच आपला कर्णधार असल्याचे स्पष्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये एंट्री होताच कर्णधार कोण असणार यावरुन तर्क वितर्क सुरु झाले होते. कारण हार्दिक पांड्या 2022 पासून आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळतोय. पहिल्यांदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं दोन वर्ष नेतृत्त्व केलं. तर, त्यानंतर तीन वर्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पांड्याने जबाबदारी पार पाडली. यामुळं हार्दिक पांड्या पंजाबमध्ये येताच तो कर्णधार असेल का याबाबत तर्क वितर्क सुरु झाले होते. या सर्व गोष्टींना हार्दिक पांड्यानं पूर्णविराम दिला आहे. त्याने श्रेयस अय्यर हा माझा कर्णधार असेल, अशी पोस्ट केली आहे.

- Advertisement -

हार्दिकची पहिली पोस्ट चर्चेत
पंजाब किंग्जमध्ये दाखल झाल्यानंतर हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर खास संदेश शेअर केला. त्याने ‘सत श्री अकाल’ म्हणत पंजाबच्या चाहत्यांना अभिवादन केले.

हार्दिकने पोस्टमध्ये म्हटले, “My Captain. Shreyas. My Coach. Ricky. My team. All of Punjab. I am standing behind you.” म्हणजेच, ‘माझा कर्णधार श्रेयस, माझे प्रशिक्षक रिकी आणि माझा संघ म्हणजे संपूर्ण पंजाब. मी तुमच्या पाठीशी उभा आहे,’ असा संदेश त्याने दिला. या पोस्टमधून हार्दिकने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळण्याची तयारी स्पष्ट केली आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली नवी भूमिका
हार्दिक पांड्या यापूर्वी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या संघांचे नेतृत्व करत होता. गुजरातला पदार्पणाच्या हंगामातच २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२३ मध्येही गुजरातने अंतिम फेरी गाठली होती. २०२४ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता पंजाब किंग्जमध्ये मात्र तो श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. हार्दिकच्या पोस्टमुळे पंजाबच्या कर्णधारपदाबाबतचा संभ्रमही दूर झाला आहे.

पंजाबच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या आगमनामुळे पंजाब किंग्जच्या संघाला अनुभव आणि अष्टपैलू पर्याय मिळणार आहे. श्रेयस अय्यरचे नेतृत्व, रिकी पाँटिंग यांचे मार्गदर्शन आणि हार्दिकचा अनुभव यामुळे आयपीएल २०२७ मध्ये पंजाबचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...