Saturday, July 6, 2024
Homeक्रीडाआयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्याने पटकावले अव्वल स्थान; 'या' खेळाडूला टाकले मागे

आयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्याने पटकावले अव्वल स्थान; ‘या’ खेळाडूला टाकले मागे

नाशिक | Nashik

- Advertisement -

टी २० वर्ल्डकप (T 20 World Cup) स्पर्धेमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. यामुळे हार्दिक पांड्याचे सर्व टीकाकार त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. भारतीय संघाला (Team India) टी २० वर्ल्डकपचा विश्वविजेता बनवण्यात त्याचा सिंहांचा वाटा आहे.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच ‘टीम इंडिया’ मालामाल, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी रक्कम

हार्दिक पांड्याने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमध्ये फलंदाजी (Bating) तसेच गोलंदाजीत केलेली कमाल त्यामुळे आयसीसीकडून (ICC) त्याला सन्मानित करण्यात आले आहे. हार्दिक पांड्या हा जगातील पहिला भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे. हार्दिकने अफगाणिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी आणि श्रीलंका संघाचा कर्णधार वनिंदु हसरंगा यांना मागे टाकत हा इतिहास रचला आहे.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा

हार्दिकने आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२४ मध्ये ८ सामने खेळले असून १४८ धावा (Run) केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय ८ सामन्यात ११ बळी घेतले आहेत. हार्दिक पांड्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. यंदाच्या हंगामात तो भारतीय संघाचा उपकर्णधार होता. मात्र भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर टी २० सामन्यातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

सलिल परांजपे, नाशिक

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या