Sunday, May 19, 2024
Homeजळगावहातेड खुर्द ग्राम पंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदाची निवड बिनविरोध

हातेड खुर्द ग्राम पंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदाची निवड बिनविरोध

 अनिल पाटील

वेले   wale ता चोपडा

- Advertisement -

येथून जवळच असलेल्या हातेड खुर्द (Hated Khurd)येथील ग्राम पंचायत निवडणुकीत (gram panchayat elections) लोकनियुक्त सरपंच (Lokayukta Sarpanch) पदाची निवड बिनविरोध (unopposed) झाली. सरपंच पदाची माळ सौ.शालिनीताई रमेश सोनवणे (Shalinitai Ramesh Sonawane)यांच्या गळ्यात पडली आहे. तर ६ ग्रामपंचायत सदस्य (member)बिनविरोध निवडून आले असूनही ३ जांगासाठी  सात उमेदवार रिंगणात आहेत. संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध (unopposed) करण्यासाठी  गावातील नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
     

  लोकनियुक्त सरपंच पदासाठी  सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते.त्यात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा रिटायर्ड ग्रामसेवक  रमेश हिंमतराव सोनवणे यांच्या धर्म पत्नी सौ शालिनीताई रमेश सोनवणे  ह्यांना सर्व प्रथम नागरिकाचा मान देऊन सरपंच पदाची माळ गळ्यात टाकली. यानिवडणूकीत सौ.प्रतिभा सुनीलभाऊ बाविस्कर, सौ.भारती राजेंद्र बाविस्कर, सुगंधाताई ज्ञानेश्वर शिरसाठ, सौ.कल्याणी दिनेश सोनवणे, सौ.ललिता चंद्रकांत सोनवणे, सुनंदा रविंद्र सोनवणे यांनी माघार घेत सौ.शालिनीताई सोनवणे ह्यांना सरपंचपदी विराजमान होण्यास मार्ग मोकळा करून दिला.

VISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज

६ ग्रा.प.सदस्य बिनविरोध विजयी
या निवडणुकीत ९पैकी ६ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.ते असे ,वार्ड क्रं.१:सौ.सुलोचना राजेंद्र सोनवणे,वार्ड क्रं.२:सौ.उज्वला सुनील पाटील, रघुनाथ हिरामण बाविस्कर,झिंगुबाई कैलास भील, वार्ड क्रं.३: अनिता समाधान शिरसाठ, पंडित पौलाद शिरसाठ

बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍यास सात वर्षांची शिक्षा VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात
वार्ड क्रं.१: मध्ये निरंजन मनोहर सोनवणे, रविंद्र दिनकर सोनवणे,निंबा दत्तात्रय बाविस्कर यांच्यात लढत आहे तर कु.मयुरी रमाकांत देवराज व सुनिता विकास बाविस्कर यांच्यात सरळ सरळ लढत आहे.शिवाय वार्ड क्रं.३मध्ये सुनील मुरलीधर शिरसाठ व रविंद्र पांडुरंग सपकाळे यांच्यात दुरंगी लढत  आहे.एकंदरीत ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत.

मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर

बिनविरोध निवड मातब्बर मंडळीचे योगदान
गावातील  लोकनियुक्त सरपंच व सहा सदस्य बिनविरोध निवडून आणण्यासाठी गावातील  डॉ.विजय शंकरराव बाविस्कर,अमृत उगतराव बाविस्कर, ज्ञानेश्वर शहादू शिरसाठ, विठ्ठल धाकू सोनवणे, अशोक बबनराव सोनवणे, अनिल अमृतराव सोनवणे, चंद्रकांत प्रल्हाद सोनवणे, रविंद्र दिनकर सोनवणे, सुनील युवराज बाविस्कर, रमाकांत साहेबराव देवराज, ज्ञानेश्वर तुकाराम अहिरे, सुनील मुरलीधर शिरसाठ, साहेबराव भिला शिरसाठ, रोहिदास भालेराव शिरसाठ, मुरलीधर आधार शिरसाठ,नथ्थू रामदास तायडे, धर्मराज लक्ष्मण बाविस्कर, युवा उद्योजक भूषण कालिदास बाविस्कर, निंबाजी श्रीराम सूर्यवंशी (माजी संचालक चोसाका), नानासाहेब रमेश हिंमतराव सोनवणे,प्रदीप पाटील,राजेंद्र सोनवणे, विजय संभाजी देशमुख,मंगल नाईक, माजी सरपंच छबिलदास वकरू भील आदींनी परिश्रम घेतले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.महाजन यांनी काम पाहिले.

४९ हजार केळी उत्पादकांना ५४ कोटींची भरपाई मिळणार – डॉ.विवेक सोनवणे

- Advertisment -

ताज्या बातम्या