Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील 'या' भागात पुन्हा कोसळणार धो-धो पाऊस

राज्यातील ‘या’ भागात पुन्हा कोसळणार धो-धो पाऊस

मुंबई | Mumbai

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटांसह (Lightning Strikes) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यातच काल अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली…

- Advertisement -

त्यानंतर आता पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर, मध्य महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाचा (Weather) अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस कोसळणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील (Madhya Maharashtra) नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापुरात पावसाचा जोर वाढणार आहे.

तसेच औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भातील (Vidarbha) बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर भागात पावसाचा जोर राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या