Thursday, May 2, 2024
HomeनाशिकVideo : नाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी

Video : नाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत असताना दुपारी दोन वाजेपासून दमदार पावसाला शहरात सुरुवात झाली. नवीन नाशिक, इंदिरानगर, नाशिकरोड, पंचवटी, जेलरोड परिसरासह शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

- Advertisement -

ढगांचा गडगडटात संततधार पावसामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे नियोजित वेळेत आगमन झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून यानंतर लवकरच पेरण्यांचा सुरुवात होणार आहे.

आज सकाळपासून उकाड्याने सर्वांनाच घाम फोडला होता. दुपारी शहरावर ढग दाटून आले. दुपारी दोनच्साया सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावत नाशिककरांना चिंब केले.

शहरातील इंदिरानगर, देवळालीगाव, पंचवटी, नाशिकरोड, सिडको परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सिडकोसह काही परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. सिडको, सातपूर, सिडको, पंचवटीसह नाशिकरोड परिसरातही पावसाने हजेरी लावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या