Friday, May 3, 2024
Homeनाशिकशिक्षण मंडळातर्फे बारावीचे मूल्यमापनासाठी हेल्पलाइन

शिक्षण मंडळातर्फे बारावीचे मूल्यमापनासाठी हेल्पलाइन

नाशिक | Nashik

करोनामुळे (Corona Crisis) यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द (10th 12th Exams Cancelled) केल्या आहेत. या दोन्ही परीक्षांच्या निकालासंदर्भात मूल्यमापन पद्धती (Results Evualtion Method) शासनस्तरावर निश्चित केली असून यासंदर्भात शिक्षकांना काही अडचणी असल्यास मदतीसाठी हेल्पलाइन (Helpline) सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात विभागीय शिक्षण मंडळाकडे (Divisional Education Board) शाखानिहाय नोंदणी केलेल्या नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी (Repeter Student’s), तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेले, तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थी यांच्या मूल्यमापनाचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे (Details of assessment and subject wise appendices) याबाबत परिपत्रक उपलब्ध आहे.

नाशिक विभागाकरीता (Nashik Division) सहाय्यक सचिव एम. यु. देवकर (८८८८३३९४२३ व ७७५५९०३४२७), वरिष्ठ अधीक्षक एन. वाय. बनसोडे (९४२१३३६८०१), सहायक अधीक्षक के. एम. अंबुलगेकर (९४२१३०३०३५) यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन विभागीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या