Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याहिंमत असेल तर नाशिकमधून खासदारकी लढवा; गोडसेंचे राऊतांना खुले आव्हान

हिंमत असेल तर नाशिकमधून खासदारकी लढवा; गोडसेंचे राऊतांना खुले आव्हान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वतःला देशाचा नेता समजत शिवसेना पक्षाचे वाटोळे केले आहे. त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी विश्वासघात केला आहे. इतरांना निवडणुकीची भाषा सांगणार्‍या संजय राऊत यांनी नाशकातून खासदारकीची निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना कळेल की हेमंत गोडसेंची ताकद काय आहे, असे खुले आव्हान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पत्रकार परिषदेत दिले…

- Advertisement -

शिवसेनेचे संपर्क नेते खासदार हेमंत गोडसे यांचा दोन दिवसाचा नाशिक दौरा सुरू असून या दौर्‍यात खासदार राऊत यांनी हेमंत गोडसेंवर कठोर प्रहार केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी शनिवारी खा. हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या सर्व मुद्द्यांचे खंडन केले.

उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार यांच्या समस्या त्यांना माहित आहेत का? सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी आपल्या खासदारकी काळात काय काम केले हे दाखवावे. राज्याचे काय प्रश्न सोडवले ते सांगावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

इडीच्या कारवाईदरम्यान संजय राऊत हे जेलमध्ये होते. तोपर्यंत शांतता होती. हा बोलणारा पोपट आहे सकाळ झाली की आपल्या चोचीतून रोज नवीन पत्ता काढत असतो. आणि त्यावर टीव टीव करतो.

खासदारकीसाठी मी चेहरा नाही असा आरोप ते करीत आहेत. माझ्या विरोधात किंवा बाळासाहेबांच्या शिवसेनेविरोधात कोणत्याही उमेदवाराला निवडून दाखवा, असे खुले आव्हान त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी सर्व खासदारांनी दोन मुद्द्यांवर एकमत दर्शवलं होतं. त्यातला एक मुद्दा म्हणजे मुर्मू यांची बिनविरोध निवड करावी आणि दुसर्‍रा म्हणजे खासदार संजय राऊत यांना बाजूला करावे मात्र उद्धव ठाकरे यांनी ते न केल्यामुळे हे परिणाम झाले असल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या बैठकांमध्ये अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय राऊत यांना फक्त सामनाचेच काम करू द्या अशी मागणी केली होती. महाविकास आघाडी स्थापन करुन त्या माध्यमातून खर्‍या अर्थाने संजय राऊत यांनीच गद्दारी केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नाशिक जिल्ह्यातील सुहास कांदे, दादा भुसे आणि माझ्यात पूर्ण समन्वय असून कोणताही दुरावा नसल्याचे सांगताना हेतू पुरस्कार काही गोष्टी पसरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या