नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील तसेच नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक 18 च्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका रंजना बोराडे यांनी आज दिल्ली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
डॉ.हेमलता पाटील व रंजना बोराडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाचे नाशिक शहरातील ताकद आणखीच वाढणार आहे या अगोदर सुद्धा अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला प्रवेश केलेल्या मध्ये काँग्रेसच्या राज्याच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका हेमलता पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रंजना बोराडे त्यांचे पुत्र राहुल बोराडे यांनी सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
नुकत्याच झालेल्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून हेमलता पाटील मध्य नाशिक मधून इच्छुक होत्या मात्र महाविकास आघाडीमध्ये सदरची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्यामुळे त्या नाराज होत्या त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाली होती.
नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक 18 च्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रंजना बोराडे त्यांचे पुत्र राहुल बोराडे यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे जेल रोड परिसरात शिवसेना शिंदे गटाची ताकद निश्चित वाढली आहे रंजना बोराडे व त्यांचे पती कैलासवासी प्रकाश बोराडे हे गेल्या तीस वर्षापासून जेल रोड मधील प्रभागा.तील प्रतिनिधित्व करत आहे.
या प्रवेशावेळी विधान परिषदेच्या माजी सभापती नीलम गोरे माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना नाशिक शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.