Saturday, September 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSenate Election : 'मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या'; उच्च न्यायालयाचे निर्देश

Senate Election : ‘मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या’; उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काल रात्री मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) एक परिपत्रक काढत सिनेटच्या निवडणुका (Senate Election) पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेत सिनेटच्या निवडणूकीच्या स्थगितीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यानंतर उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठास फटकारत उद्याच निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता उद्या म्हणजेच रविवारी (दि.२२) रोजी मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक होणार आहे.

हे देखील वाचा : Assembly Election 2024 : निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर; ११ उमेदवारांची घोषणा

उच्च न्यायालयाच्या (High Court) या निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला (Thackeray ShivSena) मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी दोनवेळा ही निवडणूक स्थगिती केली गेली होती. तसेच निवडणुकीच्या एक दिवस आधीच म्हणजे काल या निवडणुकीस स्थगिती दिली गेली होती. त्यामुळे याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

हे देखील वाचा : Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थगित, कारण काय?

दरम्यान, या निवडणुकीसाठी ठाकरे गट युवासेना विरुद्ध अभाविप (ABVP) यांच्यासह मनसेनेही (MNS) कंबर कसलेली आहे. मुंबई विद्यापीठाची १० जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार मैदानात उतरवले आहेत.विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या १३ हजार ४०६ इतकी आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या