Sunday, September 8, 2024
Homeदेश विदेशअरविंद केजरीवाल यांना धक्का; उच्च न्यायालयाचा केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार

अरविंद केजरीवाल यांना धक्का; उच्च न्यायालयाचा केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने मोठा धक्का दिलाय. आज दिल्ली उच्च न्यायालयात आज केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिलाय. तसेच या प्रकरणात सविस्तर सुनावणी होण्याची गरज असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

जामिनावर निर्णय देताना हायकोर्टाने सांगितले की, आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. ट्रायल कोर्टाने ईडीच्या रेकॉर्डकडे लक्ष दिले नाही. ईडीने दाखल केलेल्या कागदपत्रांकडे लक्ष दिले नाही. ट्रायल कोर्टाच्या टिप्पणीवर विचार करू शकत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगितीचा दिल्ली उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तो पर्यंत अरविंद केजरीवाल यांना जामीन देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी २६ जून रोजी होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, आता दिल्ली उच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती कायम ठेवल्यामुळे २६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काय होते? याकडे आपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.

उच्च न्यायालयाची टिप्पणी काय होती?
अरविंद केजरीवाल यांच्या जामिनासंदर्भात दिल्लीच्या राउज एवेन्यू न्यायालयाने दिलेल्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली. तसेच यावेळी उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टावर ताशेरे ओढले आहेत. त्याआधी काल ईडीने उत्तर दाखल करुन केजरीवाल यांना जामीन मंजूर करणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर जे काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती, त्याकडे लक्ष देणे आवश्यक मानले नाही. पण त्या कागदपत्रांवरून ते भ्रष्टाचारात किती बुडाले आहेत हे कळेल, असे म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या