Friday, May 3, 2024
Homeनगरमहामार्गाच्या संपादीत जमिनीला वाढीव मोबदला मिळावा

महामार्गाच्या संपादीत जमिनीला वाढीव मोबदला मिळावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रीनफिल्ड सुरत- हैदराबाद महामार्ग जिल्ह्यातील 49 गावांतून जात असून त्यासाठी सुमारे एक हजार 250 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना सदर महामार्गापासून मिळणारा मोबदला व इतर अधिग्रहण प्रक्रिया याबाबत निराकरण होणे आवश्यक आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्रामसभांमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे मत विचारात घेण्यात यावे, ग्रामसभेत जमिनीचे दर घोषित करून ते योग्य असल्याची ग्रामसभेकडून मान्यता घ्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे कृती समितीने केली आहे. यावेळी बाळासाहेब लटके, सचिन अकोलकर, गोधाराम पागिरे, हरी पवार, श्यामराव अंत्रे, संतोष अंत्रे, विनोद अंत्रे, यादव दिघे, गणेश अंत्रे, श्रीपाद शिंदे, विठ्ठल अंत्रे, दिलीप अंत्रे, संभाजी धुमाळ, हिरालाल शिरसाठ, भीमराज हरिश्चंद्रे आदींसह गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

- Advertisement -

जमीन अधिग्रहण कायद्यानुसार सरकार दरबारी नोंदीनुसार मोबदला जाहीर केला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सदर मोबदला 5 ते 10 पट वाढवावा, सध्याचा खरेदी दर व त्यांची सरकार दरबारी होणारी नोंद यामध्ये फारच मोठी तफावत आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी दर जाहीर करावेत, जमिनीचे होणारे विभाजन सदर महामार्गाची आखणी अशा पद्धतीने आहे, याबाबत शेतकर्‍यांना अगोदर विश्वासात घेऊनच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, शेतकर्‍यांशी चर्चा करून त्याचा योग्य मोबदला देण्यात यावा. तसेच शिवार रस्ते या महामार्गमुळे मुख्य रस्त्यापासून शेतापर्यंत जाणारे गाडी वाटा बंद होणार असून रस्त्याअभावी सदर शेती पडीक पडण्याची भीती निर्माण झालेली आहे व जमिनीचा 7/12 वरील जिरायत अशी नोंद परिसरातील सर्व जमिनी बागायती असून त्याची सरकारदरबारी नोंद व्हावी, वरील सर्व मुद्द्यांबाबत शासनाने गांभीर्याने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या