अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा कुस्तीगीर संघाने घेतलेल्या मेहनतीमुळेच नगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ऐतिहासिक ठरली. राज्य कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून कुस्ती क्षेत्राला दिशा देण्यासाठी, नवे मल्ल घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. नगरमधील कुस्तीगीरांच्या सरावासाठी मोठी तालीम व कुस्तीचे केंद्र उभारण्याचे काम भविष्यात होणार आहे. अखिल भारतीय कुस्तीगीर संघाने व राज्य संघाच्या सहकार्याने नगरमध्ये हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा घेण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी आ. संग्राम जगताप यांनी केली.
अहिल्यानगरमध्ये उत्साहात झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा व राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लांना आ. संग्राम जगताप यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र केसरी किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ यास थार, तसेच स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील विजेत्या मल्लांना बुलेट व स्प्लेंडर या दुचाकी गाड्या व अर्धातोळा सोन्याच्या अंगठ्या देण्यात आल्या. या कार्यक्रमास राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, राज्य उपाध्यक्ष प्रा.विलास कथुरे, अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाड, माजी आ. अरुण जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, बबन काशीद, जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष अर्जुन शेळके, सचिव संतोष भुजबळ, खजिनदार शिवाजी चव्हाण, कार्यालयीन सचिव निलेश मदने, शिवाजी कराळे, युवराज करंजुले, अनिल गुंजाळ आदींसह राज्यातून आलेले विजेते मल्ल उपस्थित होते. राज्य उपाध्यक्ष प्रा.विलास कथुरे म्हणले, नगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा यशस्वी ठरल्या. आ.जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन व सर्व मल्लांचीही उत्कृष्ट व्यवस्था ठेवली.
प्रास्ताविकात संतोष भुजबळ यांनी सर्वांचे स्वागत केले. उपस्थित पाहुण्यांचा बजरंगबलीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन निलेश मदने यांनी केले, अर्जुन शेळके यांनी आभार मानले. यावेळी देणगीदार राजेश भंडारी, विकी जगताप, गणेश गोंडाळ, अनुप काळे, शशिकांत घीगे, सत्येन गुंदेचा, अनिल मुरकुटे, संपत बारस्कर, आशिष पोखरणा, कमलेश भिंगारवाला, अभिजित काळे, अनुज सोनीमंडलेचा, दादा थोरात, गांधी, देशमुख, सचिन लोटके, अंदीप बोरा, मारुती जाधव, जितू गायकवाड, संतोष फुलारे व वासिम हुंडेकरी आदींनी या पारितोषिकासाठी सहकार्य केले. यावेळी निखिल वारे, काका शेळके, अजय चितळे, युवराज पठारे, संजय ढोणे, माणिक विधाते, अक्षय बाफना, बाळासाहेब जगताप, पवन बेंद्रे, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे आदी उपस्थित होते.