Friday, May 3, 2024
Homeनगरपहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करावा

पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदी भाषा प्रेमी असूनही शासनस्तरावर हिंदी भाषेची अवहेलना होत आहे. शालेय स्तरावर हिंदी विषयांच्या तासिका वाढविण्यासाठी संघर्ष करावा लागला. राष्ट्रभाषेचा सन्मान टिकविण्यासाठी पहिली इयत्तेपासून हिंदी विषय सक्तीचा करावा, अशी मागणी हिंदी अध्यापक सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम पगारे यांनी केली.

- Advertisement -

जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाच्या वतीने हिंदी शिक्षकांसाठी आयोजित हिंदी भाषा कार्यशाळेत ही मागणी करण्यात आली. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी बालभारतीच्या हिंदी भाषाधिकारी अलका पोतदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस, शालेय पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य प्राचार्य काकासाहेब वाळुंजकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, अ‍ॅड. सुभाष लांडे, नगरसेवक गणेश कवडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पोतदार म्हणाल्या,

जगात दोन नंबरची बोलली जाणारी भाषा म्हणून हिंदी भाषेचा समावेश आहे. विदेशातही हिंदीचा प्रचार-प्रसार होत असल्याने हिंदी भाषा जगात सर्वत्र पोहचली आहे. शिक्षणाधिकारी कडूस यांनी हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे आवाहन शिक्षकांना केले. महाराष्ट्रात हिंदीकडे दुर्लक्ष होत असल्याने आपण केंद्रीय स्तरावर कमी पडतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी कचरे, आप्पासाहेब शिंदे, काकासाहेब वाळुंजकर यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी अध्यापक सेवा संघाचे सचिव सुरेश गोरे यांनी केले. स्वागत शहर संघाचे अध्यक्ष रविंद्र चोभे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. निशात शेख यांनी केले. हिंदी अध्यापक सेवा संघाचे राजाराम टपले रमजान सय्यद, एकनाथ जाधव, बाळासाहेब नवले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

हिंदी अध्यापकांना पुरस्कार वितरण

डॉ. निशात शेख, शमशुद्दीन इनामदार, बेबीनंदा लांडे, हबीब शेख, बबन लांडगे, बाळासाहेब घुले, जुबेर सय्यद, भगवान मते, समिना सय्यद, सतीश पंडित, शिवनाथ वेताळ, शारदा बचाटे, सुरेश विधाते, योगेश गुंड, महेंद्र थीटे, दादा गदादे, रविंद्र चोभे, फयाज शेख, राजू भगत, नारायण झेंडें, शुभांगी पवार, सतीश झांबरे या हिंदी अध्यापकांना गुणवंत हिंदी अध्यापक म्हणून गौरविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या