Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedप्रत्येक वेळी मीच नमते घ्यायचे का?

प्रत्येक वेळी मीच नमते घ्यायचे का?

मि-मैत्रिणीचे नाते हाताळताना कोणीही मोठा किंवा कोणीही लहान नसतो. मैत्री ही पैशावरुन, इस्टेटीवरून किंवा गोर्‍या रंगावरून होत नाही, तर वैचारिक पातळीवर हे नाते जोडले जाते. एक म्हण आहे, देवाने नातेवाईक दिले, पण देवा धन्यवाद, मित्र निवडण्याची संधी मला दिली. एकंदरित नात्यापलिकडच्या मैत्रीत अहंकार, हेवेदावे, स्पर्धा या गोष्टींना थारा नसतो. निखळपणा हाच मैत्रीचा धागा आहे. मी मागे पाऊल का घ्यायचे किंवा तो पुढे का आला नाही, यापेक्षा बरोबरीने का चाललो नाही, याचा विचार करणे गरजेचे आहे.

मैत्रीचे उदाहरण सांगण्यासाठी इथे एक प्रसंग सांगता येईल. अलिकडेच विनिता नावाची महिला एक-दोन दिवसांसाठी माहेरी गेले होती. तिच्या शब्दात अनुभव कथन ऐकू. माहेरी जाताना माझे पती देखील सोबत होते. अर्थात आमच्यात कोणताही गैरसमज नव्हता. पती, पत्नी और वो प्रमाणेही काहीही झालेले नव्हते. ती एक लहान सहल होती. माहेरी असताना हाताला जुना अल्बम सापडला. त्यात माझा लहानपणीचा ङ्गोटो दिसला. पाच सहा मैत्रिणीसमवेत तो ङ्गोटो होता. एकमेकांना अलिंगन देत किंवा बिनधास्तपणे स्कूटी चालवताना असे ते ङ्गोटो होते. ङ्गोटो पाहताना माझ्या पतीने विचारले की ‘ती’ कोण. मी तिला आतापर्यंत तुझ्या ङ्गेसबुक अकाऊंटला पाहिले नाही. मग मीही विचारले, काय हो, तुम्हाला माझ्या मैत्रिणीत एवढा रस का. ते लाजले आणि इकडे तिकडे पाहू लागले. ती माझी कॉलेजची अतिशय जवळची मैत्रिण होती. आता मात्र मी तिच्याशी बोलत नाही. आम्ही एकमेकांच्या संपर्कात देखील नाही. शाळा, कॉलेजमध्ये असताना मी नेहमी तिच्या घरी डबा खायचे. तिची स्कूटी देखील ङ्गिरवत असे. मॅटनी शो पाहण्यासाठी आम्ही काही वेळा क्लासला दांडी देखील मारली आहे. तिच्यासाठी मी इतरांचे वैरही पत्करले. एवढी घनिष्ट मैत्री असतानाही आता आम्ही बर्‍याच वर्षांपासून एकमेकांपासून बोलत नाही. अर्थात असा अनुभव अनेकांनाही आला असेल. शाळा, कॉलेजमध्ये एकमेकांशिवाय न राहणारी मित्र-मैत्रिणी आता वर्षानुवर्षे संपर्कात नाहीत. मीही आता तिच्याशी बोलत नाही. जुन्या मित्रांशी संबंध तोडणारी मी काही पहिली मैत्रिण नाही. आपण कितीही सामाजिक आणि मनमिळावू वृत्तीचे असलो तरी माझ्यासारखे अनेक मंडळी असे आहेत की त्यांनी जुन्या मित्रांशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून बोलणे बंद केले असेल. मग ते मित्र असू शकतात, नातेवाईक, शेजारी किंवा सहकारी असू शकतात.

- Advertisement -

चांगल्या संबंधांवर फुलस्टॉप का आणखी एक प्रसंग. माझ्या आजोबाने एका कारणावरुन त्यांच्या दुसर्‍या मुलाशी म्हणजेच माझ्या काकाशी बोलणे बंद केले होते. काही वर्षापूर्वी सर्वजण एकत्रपणे सण साजरे करायचो. एकत्र जेवायचो, एकत्र प्रवास करायचो. परंतु दोघांनी आपला इगो सोडला नाही. ही स्थिती आजोबाचा मृत्यू होईपर्यंत कायम राहिली. साहजिकच अंत्यसंस्काराच्या वेळी काकांना अपराधीपणाची भावना मनात बोचत होती. मी माझ्या मुलाशी दररोज बोलते. परंतु मनात एक विचार येतो की, असे कोणते मुद्दे असतात की वडिल मुलाशी बोलणे बंद करतात. समस्या एवढी गंभीर असते की, पोटच्या मुलाशी बोलणेच बंद होते. परंतु हे सत्य नाही. काहीवेळा कारणं एवढी किरकोळ असतात की, कालांतराने राग वाढत जातो. जसजसा अनुभव वाढत जातो, आपण अधिक परिपक्व होत राहतो. काही दिवसांनंतर ते चांगले संबंध तुटण्याचे कारण हे खूपच अनाठायी होते, असे लक्षात येते.

पश्‍चाताप निश्‍चित होतोकाही मंडळी मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य हे अतिशय किरकोळ कारणावरून बोलणे सोडून देतात. उधारीवर दिलेले पैसे विसरणे, कम्पाऊंडचे बांधकाम, गल्लीतील झाड तोडणे, मुलांतील भांडणं, वाहनाची चुकीची पार्किंग या कारणावरुन एकमेकांशी वाद होतात. हे वाद संबंध तोडण्याइतपत निश्‍चितच नाहीत. किरकोळ कारणावरून संबंध तोडणारी मंडळी आता पश्‍चातापही करत असतील. माझी मैत्रिण खूपच अहंकारी आणि घमेंडखोर असल्यामुळे मी बोलण्याचे थांबविले होते. तिने मला बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु मी तिला प्रतिसाद दिला नाही. परंतु आता मला वाटते की, आपण बोलण्याचे थांबवून काय मिळवले. ती आपल्या आयुष्यातून कायमची निघून जावी, असे मला वाटत होते. पण जर आपण प्रत्येकाच्या बाबतीत अशीच ङ्गुलपट्टी लावली तर काही काळाने आपणच एकटे पडू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या