Friday, May 3, 2024
Homeनाशिकस्टाईसकडून नवदुर्गा उद्योगिनींचा सन्मान

स्टाईसकडून नवदुर्गा उद्योगिनींचा सन्मान

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

तालुका औद्योगिक सहकारी वसाहत (स्टाईस) STICE व सिन्नर महिला उद्योजक समितीकडून Sinnar Women Entrepreneurs Committee महिला उद्योजक मेळावा व नवरात्री निमित्त नवदुर्गा Navdurga शक्तीचा जागर समारंभाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. यावेळी नवदुर्गा उद्योगिनींचा सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

संस्थेत यशस्वीपणे आपला स्वत:चा उद्योग चालविणार्‍या महिलांना संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सिमा कोकाटे, संस्थेच्या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे-गडाख, महिला समिती सदस्य मिनाक्षी दळवी, गायत्री वर्पे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यापुढे नऊच नाही तर संस्थेमधील सर्वच महिला पुरस्काराने सन्मानीत झाल्या पाहिजे असल्याची भावना तांबे यांनी व्यक्त केली. शुन्यातून उद्योग उभा करणे हे अतिशय अवघड काम असून त्याची तुलना कशाशीही होवू शकत नसल्याची भावना माळोदे-गडाख यांनी व्यक्त केली. कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते. पुरस्कार मिळालेल्या महिलांनी स्वत: कष्ट करुन उद्योगाचा टर्न ओव्हर वाढविलेला आहे. अशाचप्रकारे प्रत्येक महिलेने आपला स्वत:चा उद्योग सुरु करावा व स्वाभिमानाने उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेच्या कायक्षेत्रातील बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या. सुत्रसंचलन राजेंद्र जेजूरकर व नितीन शिंदे यांनी केले.

यांचा झाला सन्मान

शरयू देशमुख, विना देशमुख, मिरा डावखर, उत्तरा पुरणदरे-जाधव, सुनंदा मुटकुळे, इंदुमती बिहाणी, अंजली कटारीया, योगिता महाजन या महिला उद्योजकांना यशस्वी उद्योजीका म्हणून गौरविण्यात आले. सुरेखा उन्हाळे यांना जिवनगौरव पुरस्कार देण्यात आला. कै. मिना देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कामगार व कर्मचार्‍यांना सुरू असलेल्या लसिकरण मोहिमेत कार्यरत असलेल्या परिचारिकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या