Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनसुशांतच्या गळ्यावर 15 ते 20 सुयांच्या खुणा

सुशांतच्या गळ्यावर 15 ते 20 सुयांच्या खुणा

मुंबई | Mumbai –

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढतच असून या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत.

- Advertisement -

सीबीआय टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्ती सोबतच या प्रकरणातील इतर संबंधितांची देखील सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. मात्र, असं असताना शनिवारी सुशांतची बहीण श्‍वेताने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर न्यूज नेशन या चॅनलचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयाचा कर्मचारी असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहावर सुयांच्या खुणा असल्याचं सांगत आहे. त्यावर, हे देवा, त्यांनी माझ्या भावासोबत काय काय केलं आहे? त्यांना अटक व्हायला हवी, असं ट्वीट श्वेताने केलं आहे.

दरम्यान, पोस्टमार्टेम अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहावर गळफासाच्या खुणेशिवाय अजून कोणतीही खूण किंवा जखम नव्हती. मात्र, रुग्णालय कर्मचार्‍याच्या दाव्यानुसार, सुशांतच्या गळ्यावर तब्बल 15 ते 20 सुया टोचल्याच्या खुणा होत्या. शिवाय, त्याचा पाय देखील तुटलेल्या अवस्थेत होता. त्याच्या गळ्याला टेप चिकटवलेला होता. जेव्हा त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आला, तेव्हा त्याचा पाय दुमडलेला होता. हे दावे समोर आल्यानंतर या प्रकरणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या होती की हत्या? या मुद्द्यावरून सध्या वाद आणि राजकारणही सुरू असताना अशा प्रकारचा दावा समोर आल्यामुळे या वादाला अधिकच खतपाणी घातलं गेल्याचं बोललं जात आहे.

मृतदेह पिवळा पडला होता – सुयांच्या खुणांसोबतच सुशांतचा मृतदेह पिवळा पडला होता असा दावा देखील रुग्णालय कर्मचार्‍याने केला आहे. आम्हाला मृतदेहाची परिस्थिती लगेच लक्षात येते. गळफास घेतल्यानंतर मृतदेह पिवळा पडत नाही. पण आम्ही जेव्हा सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कूपर रुग्णालयात नेत होतो, तेव्हा त्याचा मृतदेह पिवळा पडला होता, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्की सुशांतसोबत काय झालं होतं? याविषयीचं गूढ अधिकच वाढलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या