Sunday, May 5, 2024
Homeनाशिकनाशिक मनपा अधिकाऱ्यांकडून 'हे' हॉटेल सील

नाशिक मनपा अधिकाऱ्यांकडून ‘हे’ हॉटेल सील

नाशिक । Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयांतर्गत एक हॉटेल सील करण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करोना बाबतच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना विरुद्ध मनपाने कारवाईचा बडगा उभारला असून मा. आयुक्त कैलास जाधव यांच्या निर्देशानुसार पश्चिम विभागीय कार्यालय अंतर्गत मा.उपायुक्त अर्चना तांबे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे व पथकाने शनिवारी रात्री कार्यवाही करीत हॉटेल अय्यंगर डोसा पॉईंट मध्ये सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याबद्दल पाच हजार रुपये दंड करून हे हॉटेल सील करण्यात आले असल्याची माहिती विभागीय अधिकारी जयश्री सोनावणे यांनी दिली आहे.

तसेच एअरटेल ऑफिस,सीए जगताप अँड कंपनी, एअर कंडिशनर शॉप व व्हाईट एजंल इव्हेंट या आस्थापना उघड्या ठेवल्याबद्दल प्रत्येकी ५०००/- रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला व अस्वच्छतेबद्दल विभागातील शालिमार येथील एका रसवंतीगृहास एक हजार रुपये व मास्क न वापरणाऱ्या ८ नागरिकांवर कार्यवाही करण्यात येऊन सोळाशे रुपये व अस्वच्छतेबद्दल पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असा एकूण २८ हजार १०० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.

पश्चिम विभागाने केलेल्या कार्यवाहीत उपायुक्त अर्चना तांबे विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, अधीक्षक हरिश्चंद्र, विभागीय स्वच्छता निरीक्षक प्रभाकर पाटील, स्वच्छता निरीक्षक दिलीप चव्हाण, स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड व स्वच्छता निरीक्षक अनिकेत कुलकर्णी, उद्यान विभागाचे सुदर्शन गायधनी व संजय चौधरी एम टी एस विभागाचे शिर्के, स्वच्छता निरीक्षक वेदांत खोडे हे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या