Wednesday, June 19, 2024
Homeक्राईमNashik Crime News : जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

Nashik Crime News : जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

जुने नाशिक (Old Nashik) येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या द्रव पदार्थाच्या बाटल्या फेकून वाहने पेटवली. तसेच एका घरावर (House) पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने याने जीवित हानी झाली नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात (Bhadrakali Police Station) अज्ञात व्यक्तींविरोधात जाळपोळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : मराठा क्रांती मोर्चाचा नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मविआच्या उमेदवारांना पाठिंबा

याबाबत अधिक माहिती अशी की, नवाज अब्दुल शहा (रा. अमरधाम रोड, नानावली, भद्रकाली) यांच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्हीत जाळपोळीचा प्रकार कैद झाला आहे. मेकॅनिक असलेले नवाज यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासह परिसरातील इतरांच्या चारचाकी व दुचाकी वाहने अमरधाम रोडवरील देशी दारुच्या दुकानासमोर, फेमस बेकरी जवळ व जहांगिर कब्रस्तान जवळील परिसरात उभ्या होत्या. गुरुवारी (दि.१६) मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने परिसरातील (Area) सात दुचाकी, तीन कार व एक ट्रक अशा वाहनांवर ज्वलनशिल पदार्थ टाकून त्यांना आग लावली.

हे देखील वाचा : मनमाडचा पाणी प्रश्न लवकरच सोडविला जाईल, आमदार कांदेंचे लोकांसाठी चांगले काम – फडणवीस

आगीत दुचाकी व ट्रकचे अतोनात नुकसान झाले असून चारचाकी वाहने सुदैवाने वाचली आहेत. आगीमुळे परिसरातील घरांना आग लागून जीवितहानी होण्याचा धोका असताना देखील आरोपींने वाहनांना आग लावल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले. दरम्यान, जाळपोळ करणाऱ्यांनी जहांगिर कब्रस्तान जवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचाही प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी वेळीच धाव घेत आग (Fire) विझवली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी नानावली येथे ट्रकच्या टायरला लागलेली आग विझवली. या जाळपोळीत वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. टवाळखोरांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे.

हे देखील वाचा : पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले मागील ५६ वर्षांपासून मी…

गस्त, बंदोबस्त सभा, मोर्च्यांसाठीच

लोकसभा निवडणूकीमुळे शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात असून गस्तही वाढवण्यात आली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग संवेदनशिल असल्याने तेथे जादा फौजफाटा आहे. मात्र तरीदेखील दुचाकीवरून येऊन भद्रकाली पोलिस ठाण्याजवळील परिसरातील वाहनांची जाळपोळ करीत तिघे संशयित फरार झाले. .

कठोर कारवाई होईल

एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जाळपोळ केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. जाळपोळ करणाऱ्यांना लवकरच अटक केली जाईल. तिघांना अटक केल्यानंतर जाळपोळ का केली याचे कारण समोर येईल.

गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या