Thursday, March 13, 2025
Homeभविष्यवेधखुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरुन कसा कळतो स्वभाव ?

खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरुन कसा कळतो स्वभाव ?

ज्योतिषी आपल्या तळहातावरच्या रेषा वाचून आपलं भविष्य वर्तवत असतात. आपल्याबरोबर काय चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडतील, याबाबत ते एक अंदाज वर्तवत असतात. पण, सामुद्रिकशास्त्रानुसार माणसाची वर्तणूक, त्याच्या उठण्या-बसण्याच्या पद्धती, शरीरयष्टी यावरूनही त्यांच्याबद्दल बर्‍याच गोष्टी कळू शकतात.

ज्योतिषी आपल्या तळहातावरच्या रेषा वाचून आपलं भविष्य वर्तवत असतात. आपल्याबरोबर काय चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडतील, याबाबत ते एक अंदाज वर्तवत असतात. पण, सामुद्रिकशास्त्रानुसार माणसाची वर्तणूक, त्याच्या उठण्या-बसण्याच्या पद्धती, शरीरयष्टी यावरूनही त्यांच्याबद्दल बर्‍याच गोष्टी कळू शकतात. सामुद्रिक शास्त्राचे जाणकार माणसाच्या खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या स्वभावाबद्दल माहिती देतात. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या सहकार्‍यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही कल्पना येऊ शकते.

  1. खुर्चीवर बसताना काही लोक गुडघे जवळ ठेवतात आणि पायाच्या तळव्यांमध्ये खूप अंतर ठेवतात. या लोकांना जबाबदारीची जाणीव फारच कमी असते, असं म्हटलं जातं. आकर्षक व्यक्तिमत्व व स्पष्टवक्ते असूनही हे लोक कठीणप्रसंगी सर्वांत आधी माघार घेतात.
  2. याउलट, जे लोक पाय वरून थोडेसे खुले ठेवून बसतात आणि घोटे जवळ ठेवतात, ते आरामदायी जीवन जगण्यास प्राधान्य देतात. असे काही लोक मेहनत करून मनं जिंकतात. पण, त्यांची एकाग्रता फार लवकर भंग होते, त्यांचं मन नेहमी इतर ठिकाणी भटकत असतं. अशा लोकांना विनाकारण समस्या ओढवून घेणं आवडत नाही.
  3. तुम्ही अनेकांना पायांच्या वर पाय ठेवून बसलेले किंवा पाय एकमेकांवर तिरपे (क्रॉस) ठेवून बसताना पाहिलं असेल. सामुद्रिकशास्त्रानुसार असे लोक खूप रचनात्मक असतात. त्यांचा स्वभाव थोडा लाजाळू आणि नम्र असतो. ते खूप आनंदाने जीवन जगतात. जगासमोर लाज वाटेल, अशी कामं करणं ते टाळतात.
  4. जे लोक खुर्चीवर बसताना आपले पाय गुडघ्यापासून घोट्यापर्यंत सरळ ठेवतात आणि कंबरही नेहमी सरळ असते, ते शिस्तप्रिय असतात. हे लोक अत्यंत वक्तशीर असतात आणि आत्मपरीक्षण करतात. या लोकांना कोणतंही काम करताना आपलं 100 टक्के योगदान द्यायला आवडतं. त्यांना बेजबाबदार लोकांची संगत आवडत नाही. ते असभ्य वर्तन करणार्‍यांना सहन करत नाहीत. असे लोक आयुष्यात खूप प्रगती करतात.
  5. दुसरीकडे, जे लोक आपले पाय एकत्र ठेवतात आणि खुर्ची थोडी तिरकस ठेवून काम करतात, ते थोडे हट्टी मानले जातात. पण, ते खूप महत्वाकांक्षी असतात. असे लोक एखाद्या कामात गुंतले की ते काम पूर्ण करूनच थांबतात. यामुळेच त्यांना यश मिळण्याची शक्यता खूप जास्त असते.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...