Sunday, June 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News: अवैध कुंटनखान्यावर ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटचा छापा

Nashik Crime News: अवैध कुंटनखान्यावर ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटचा छापा

दिंडोरी | प्रतिनिधी
रोहिदास नगर येथे हिराबाई बबन चव्हाण (वय ६०) ही महिला घरीच अवैधरित्या कुंटनखाना चालवत असल्याची गुप्त माहिती ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटला मिळाली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला व छापा टाकत कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी २८ वर्षीय पीडितेची सुटका केली असून, तिच्याकडून आर्थिक फायद्यासाठी अनैतिक व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी हिराबाई चव्हाण विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.

- Advertisement -

या प्रकरणी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटचे हवालदार बाळकृष्ण पजई यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी हे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Session : महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; मुख्यमंत्र्यांना लिहिले...

0
मुंबई | Mumbai राज्य विधिमंडळाचे उद्यापासून (दि.२२ जून) पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, या अधिवेशनापूर्वीच्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची...