शिरूर (तालुका प्रतिनिधि)
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील म्हसेफाटा येथे गुरूवार (दि.22) रात्री ललिता महादेव काळे हिचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरून कुर्हाडीने वार करून खून केला आहे.
म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे घरकुल बांधलेले आहेत. या घरकुलामध्ये शेजारी शेजारी पाच कुटुंब राहत आहेत. टाकळी हाजी येथील लताबाई काळे यांचा महादेव हा जावई आहे. मूळचा सोगाव पश्चिम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेला महादेव याने चार वर्षांपूर्वी ललिता हिच्याशी विवाह केला होता. त्यांचे दोघांचे कायमच भांडत होत होते.
गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट झाली. तेव्हा दोघांचे भांडण झाले होते आणि त्यावेळी तो तिला चारित्र्यावरून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानेच ललिता हीचा कुर्हाडीने वार करून खून केला आहे, असे ललिताची बहीण चांदणी हिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पहाटे चार वाजता त्याच्या मोटारसायकलचा आवाज आल्याने शेजार्यांनी त्याच्या घराकडे पाहिले, तेव्हा तो मोटार सायकल चालू करून पळून चाललेला दिसून आला.