Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमCrime News : पतीकडून पत्नीची बेदम मारहाण करून हत्या

Crime News : पतीकडून पत्नीची बेदम मारहाण करून हत्या

संशयित पती अटकेत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री तांबे मळा, बुरुडगाव येथे घडली. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या काही तासांत अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा खरात या आपल्या पती सुभाष खरात याच्यासोबत तांबे मळा, बुरुडगाव येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. दोघेही मूळचे सुशीवडगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील असून उदरनिर्वाहासाठी अहिल्यानगर येथे वास्तव्यास होते.

- Advertisement -

त्यांच्या दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (दि. 18) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. त्यावेळी आरोपी सुभाष खरात याने पत्नी मनिषा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे डोके भिंतीवर आपटून गंभीर दुखापत केली. मारहाणीनंतर त्याने पत्नीला घराबाहेर टाकून घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नातेवाईकांनी ही माहिती मनिषा यांच्या भाऊ गणेश अशोक घोडके यांना दिली. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले असता मनिषा या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यांनी तत्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले तसेच रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी गणेश घोडके यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष रखमाजी खरात याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला काही तासांत अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, मंगेश खरमाळे, विक्रांत भालसिंग आणि नितीन शिंदे यांनी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...