Friday, May 3, 2024
Homeनाशिकदुचाकीवरून तोल गेल्याने कालव्यात पडले; जवान बेपत्ता, पत्नी आणि दोन मुलांना...

दुचाकीवरून तोल गेल्याने कालव्यात पडले; जवान बेपत्ता, पत्नी आणि दोन मुलांना वाचवण्यात यश

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

शिर्डीवरुन (Shirdi) साईबाबांचे (Saibaba) दर्शन घेऊन दुचाकीवरुन परतताना केंद्रीय राखीव सुरक्षा दलात कार्यरत असलेले जवान आपली पत्नी व दोन मुलांसोबत दुचाकीवरील तोल जाऊन कालव्यात पडल्याची घटना गुरुवारी (दि.10) सायंकाळच्या सुमारास घडली…

- Advertisement -

स्थानिकांच्या मदतीने पत्नी व मुलांना बाहेर काढण्यात यश आले मात्र, जवान कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले असून अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही.

गणेश सुकदेव गिते (36) असे या जवानाचे नाव असून ते पत्नी मुलांसह शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून दुचाकीने गावाकडे परतत असताना सिन्नर तालुक्यातीलचोंढी शिवारात ही घटना घडली.

मेंढी येथील गणेश सुकदेव गिते केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत असून पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात आहे. 24 फेब्रुवारी रोजी ते सुट्टीवर आलेले आहेत. गणेश पत्नी रुपाली ( 30 ), मुलगी कस्तुरी (7) व मुलगा अभिराज (दीड वर्षे) यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी गेलेले होते.

सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरापासून 300 मिटर अंतरावर तवंग परिसरात मेंढी-ब्राम्हणवाडे रस्त्यावरील वळणावर गणेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल उजव्या कालव्यात पडली. कालव्याला आवर्तन सुटलेले असल्याने दुचाकी पडण्याचा आवाज होताच जवळच असलेल्या नितीन रावसाहेब गिते याने धाव घेतली.

Accident : शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; ३५ जखमी

पाण्यात पडल्यानंतर गणेश व नितीन यांनी गणेशची पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी व मुलगा अभिराज यांना बाहेर काढले. मात्र, पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेले. घटनेनंतर आदिवासी बांधवांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गणेशचा शोध सुरु केला.

दरम्यान, घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार, हवालदार हिरामण बागुल, विजयसिंग ठाकुर, पोलिस नाईक धनाजी जाधव, विनोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; ट्रक थेट पुलावरुन कोसळला खाली, चालकाचा जागीच मृत्यू

ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत गणेश यांचा शोध सुरु होता. आज (दि.10) सकाळपर्यंत गणेश यांचा कुठेही तपास लागलेला नाही. पोलिसांकडून पाण्यात बोट उतरवण्यात आल्या असून त्यांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या