Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपाणी पितोय, पण सर्व मागण्यांची अमलबजावणी झाल्या शिवाय उपोषण सोडणार नाही -...

पाणी पितोय, पण सर्व मागण्यांची अमलबजावणी झाल्या शिवाय उपोषण सोडणार नाही – मनोज जरांगे पाटील

हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु करणार; मराठा मंत्रालयाची स्थापना होणार - आ.प्रसाद लाड

- Advertisement -

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज आमदार प्रसाद लाड यांनी दिली . यावेळी त्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे सुरु करणार असून सांगितले असून जरांगे पाटील यांच्या सर्व अटी सरकारने मान्य केल्याची माहिती यावेळी प्रसाद लाड यांनी दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. किमान चार प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप सुरू होऊ द्या मग बघू, असंही ते म्हणाले. इतकंच काय तर हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप मराठवाड्यातून सुरू व्हावं, असंही मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही, यावर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले. सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असं त्यांनी सर्वांसमोर जाहीर केलं.

ओबीसी समाजाला ज्या -ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती मराठा समाजाला देखील मिळणार हैदराबाद गॅझेनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, ती अट देखील सरकारने यावेळी मान्य केली आहे. हैदरबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळतील असं प्रसाद लाड यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय म्हणाले आमदार प्रसाद लाड
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, ‘दादा, मी विनंती करायला आलो आहे. मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतोय उपोषण करु नका. तुमच्या मनात जे आहे तेच होणार आहे. तुमचा विषय सोडवण्यासाठी आम्ही आहोत. काल रात्रीपासून मलाही झोप लागली नाही. डोळ्यात अश्रु आहेत. मी आज तुमचा भाऊ म्हणून आलोय. जरांगेंना साथ देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या 15 मागण्याची उत्तर पाठवली होती. दादांना प्रशासनाशी बोलायचे नव्हते. त्यांच्या मोठ्या भावाच्या रुपाने आलो आहे.जिल्हानिहाय नोडल ऑफिसर नेमला आहे. मंत्रालयातही कक्ष स्थापण करत आहोत. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु करणार. पहिले प्रमाणपत्र दादांच्या हातातून देणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार दादांच्या मागे उभे आहे. असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हंटले आहे

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
दरम्यान या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी, सातारा कोल्हापूर गॅजेट साठी सरकारला दोन दिवसाचा वेळ देतो, सर्व अमलबजावणी साठी जीआर काढा, सर्व मागण्यांची अमलबजावणी झाल्या शिवाय उपोषण सोडणार नाही असे जरांगे पाटील यांनी म्हण्टले आहे, दोन दिवसात अमलबजावणी करा

ताज्या बातम्या

Nashik News : राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य – विजय...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जादायी आणि...