Tuesday, November 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य - विजय वडेट्टीवार

Nashik News : राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य – विजय वडेट्टीवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जादायी आणि मोलाचे मार्गदर्शन केले. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून जनतेचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्याचा नवा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असल्याचे विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शिबिराच्या समारोपानंतर राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती, जनतेसमोरील ज्वलंत प्रश्न तसेच आगामी काळातील संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.

काँग्रेसच्या संघटनात्मक विस्तारासोबतच सामान्य जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. जनतेच्या न्यायासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिक ताकदीने रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला.‘संघटन सृजन अभियान’च्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच कार्यकर्त्यांना वैचारिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळातयाचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची ओवाळणी कोणाला?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्‍या दिवशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बँकेत सहकार विकास आघाडीला स्पष्ट बहुमत...