Tuesday, May 7, 2024
Homeनगरमी सर्वात मोठा जुगारी, मला अटक करा… शेतकऱ्याची अजब मागणी, नेमकं प्रकरण...

मी सर्वात मोठा जुगारी, मला अटक करा… शेतकऱ्याची अजब मागणी, नेमकं प्रकरण काय?

वैजापूर | प्रतिनिधी

आपण जुगारी असून मला अटक करा अशी अजब मागणी वैजापूरात एकाने चक्क पोलीस प्रशासनाला केली आहे. ज्ञानेश्वर उगले (रा.बोरदहेगाव) असे मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

- Advertisement -

यावर्षी एकूण ४ लाखांचा जुगार खेळला आहे व त्यात संपूर्ण पैसे हारले असून वैजापूर उपविभगाच्या सहा.पोलीस अधीक्षक महक स्वामी व तहसीलदार यांना आपण जुगारी असल्याने अटक करावी अशी मागणी केली आहे.

Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

उगले हे बोरदहेगाव येथील रहिवासी असून ते शेतकरी आहेत. आपले तिघे बंधू व चुलते अश्या एकत्र घरामध्ये राहून ते शेती करून आपला संसार चालवतात. यावर्षी त्यांनी जवळ साडेपाच एकर शेतात कांदे लावले होते. मेहनतीने पिकवले कांदे त्यांनी शनिवार रोजी काढले.

मात्र कांदे भरत असताना अचानक वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने कांदे हे पूर्ण भिजले. त्यांनी काढलेले १००० ते १२०० क्विंटल कांदे हे जमिनोदोस्त झाले. कांद्यासाठी लावलेले ४ लाख हून अधिकची रक्कम चिखलात बुडाली.

Samruddhi Mahamarg : शेतकऱ्याने ट्रॅक्टर आडवे करून रोखला ‘समृद्धी महामार्ग’… कारण काय?

यामुळे आपण खेळलेल्या या जुगारात सर्व काहीं हरलो, तसेच पोलीस अधीक्षक मॅडम तुम्ही दारू वाले, मटका खेळणारे, आकडा खेळणारे या किरकोळ अपराध्यांना न पकडता माझ्या सर्व शेतकरी बंधूंना पकडा, ते नेहमीच लाखोंचा जुगार खेळता अन् जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे म्हणून आम्हाला जेलमध्ये टाका अशी अशी मागणी शेतकऱ्याने केली.

DRDO च्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला…

गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसानं (Unseasonal News) जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळं धान उत्पादक शेतकरी असो किंवा पालेभाजी वा बागायती शेती करणारे शेतकरी, निसर्गाच्या दुष्टचक्रात सर्वच सापडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या