Saturday, October 24, 2026
Homeदेश विदेशमी तुम्हा दोघांवर २५० टक्के प्रचंड टॅरिफ लावणार...; भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा ट्रम्प...

मी तुम्हा दोघांवर २५० टक्के प्रचंड टॅरिफ लावणार…; भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा

नवी दिल्ली | New Delhi
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २०२५ मधील लष्करी संघर्ष थांबवण्यासाठी आपण दोन्ही देशांना २५० टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली होती, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. दोन्ही देशांनी संघर्ष सुरू ठेवल्यास अमेरिकेसोबत व्यापार करता येणार नाही, असा इशाराही आपण दिल्याचे ट्रम्प म्हणाले. या संघर्षादरम्यान ११ विमाने पाडण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेच्या भूमिकेवरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

ट्रम्प यांनी २३ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे प्रचारसभेत बोलताना हा दावा केला. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही अण्वस्त्रसज्ज राष्ट्रे असून त्यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी व्यापाराचा दबाव वापरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संघर्ष थांबवण्यात अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा भारताने यापूर्वी अनेकदा फेटाळला आहे.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
फ्लोरिडामधील एका निवडणूक रॅलीदरम्यान ट्रम्प यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना त्यांनी दोन्ही देशांना अमेरिकेसोबतचा व्यापार बंद होऊ शकतो, असा इशारा दिला होता.

“तुम्ही दोन अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांमधील संघर्ष थांबवता. मी त्यांना सांगितलं, ‘मित्रांनो, जर तुम्ही असंच करत राहिलात, तर तुम्हाला अमेरिकेसोबत व्यापार करता येणार नाही. मी तुम्हा दोघांवरही २५० टक्के इतकं प्रचंड आयात शुल्क लावणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही व्यापार करता येणार नाही”, असे ट्रम्प यांनी म्हटलं.

#WATCH | US President Donald Trump says, “…You stop India and Pakistan, two nuclear nations… I said, “Fellas, if you guys are going to do that, you’re not going to trade with the United States…I’m going to put massive tariffs on both of you, 250 percent, so you won’t be able to do any business.” They got very upset, very angry; they stopped shooting, and the war was over…Eleven planes were shot. I stopped all these wars, and it’s really an honor to do so…”

(Video Source: Reuters)— ANI (@ANI) October 23, 2026

त्यांनी दावा केला की, त्यांच्या इशाऱ्यामुळे दोन्ही देश संतप्त झाले, परंतु त्यांनी गोळीबार थांबवला आणि युद्ध संपले. ट्रम्प म्हणाले, “युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली. मी ते थांबवले आणि असे करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती.”

भारताने दावे फेटाळले
भारताने कोणत्याही त्रयस्थ पक्षाच्या मध्यस्थीला सातत्याने नकार दिला आहे. भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) संपर्क साधून कारवाई थांबवण्याची विनंती केल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान लष्करी कारवाई थांबवण्याचा करार झाला. याशिवाय, भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान ११ विमाने पाडण्यात आल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताने सातत्याने फेटाळला आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीमध्ये कोणत्याही त्रयस्थ पक्षाचा मध्यस्थी नव्हती.

ताज्या बातम्या

व्यवहारातून व्यावसायिकाची ७० लाखांची फसवणूक; आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) शहरातील सारडा गल्ली, गंज बाजार परिसरातील दुकानाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून एका व्यावसायिकाची ७० लाख १० हजार रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इम्रान...