Wednesday, April 8, 2026
Homeक्रीडाAusVsZim ICC T-20: टी-२० विश्वषचकातील सर्वात मोठ्या 'अपसेटची' नोंद; झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मिळवला...

AusVsZim ICC T-20: टी-२० विश्वषचकातील सर्वात मोठ्या ‘अपसेटची’ नोंद; झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय

मुंबई | Mumbai
टी-20 विश्वचषक 2026 मध्ये शुक्रवारी एक असा चमत्कार घडला, ज्याची कल्पना कदाचित कोणत्याच क्रिकेट चाहत्यांनीही केली नसेल. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या ‘ग्रुप बी’ मधील सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत विश्वचषकातील सर्वात मोठा अपसेट नोंदवला आहे. आर.प्रेमदासा स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने सर्वांगीण सुरेख खेळ करत ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ ठरवले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावांतच आटोपला.

आयसीसी टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या १९ व्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने समान्यात मोठा उलटफेर पहायला मिळाला. या विजयासह झिम्बाब्वे टीमने या स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि मजबूत फलंदाजी लक्षात घेऊन त्यांनी रन्स चेज करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे फेल गेला.

- Advertisement -

झिम्बाब्वेच्या फलंदाजांचा आस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा झिम्बाब्वेचा निर्णय सार्थ ठरला. सुरुवातीपासूनच झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव टाकला. निर्धारित २० षटकांत झिम्बाब्वेने केवळ २ गडी गमावून १६९ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर ब्रायन बेनेटने ७ चौकारांसह ६४ धावांची शानदार नाबाद खेळी केली. तदिवानाशे मारुमानी यांनीही ११ चेंडूत ३५ धावा केल्या. रायन बर्लने ३० चेंडूत ३५ धावा केल्या आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी १३ चेंडूत नाबाद २५ धावा करून संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

Nashik News: मिलिंद नगरला अतिक्रमण निर्मूलन मोहिम; २७ घरांचे काढले अतिक्रमण

ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला
झिम्बाब्वेच्या संघाने ऑस्ट्रेलियासमोर १७० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ १४६ धावांवर गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची मॅट रेनशॉ आणि ग्लेन मॅक्सवेल ही जोडी मैदानावर आली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाने २९ धावांतच ४ गडी गमावले. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून मॅट रेनशॉने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली.

१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. झिम्बाब्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ १४६ धावांत गारद झाला. झिम्बाब्वेच्या चपळ क्षेत्ररक्षणाने आणि अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीने कांगारूंना २३ धावांनी पराभवाची धूळ चारली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श दुखापतीमुळे या लढतीतही खेळू शकला नाही. ट्रॅव्हिस हेडकडे संघाचं नेतृत्व होते. पर्यायी बदली खेळाडू म्हणून स्टीव्हन स्मिथला उतरवण्यात आले. मात्र तो अद्याप कोलंबोत पोहोचलेला नाही असे हेडने नाणेफेकीवेळी स्पष्ट केले. सामन्यादरम्यान पहिल्या डावात स्टॉइनसही दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत भर पडली. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड हे प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकले नाहीत.

या विजयासह ब गटाची गुणतालिका रंजक झाली आहे. श्रीलंकेने दोन लढतीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा धुव्वा उडवला मात्र झिम्बाब्वेविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. झिम्बाब्वेने दोन सामने खेळून दोन्ही जिंकले आहेत. त्यांचे ४ गुण झाले आहेत. ते दुसऱ्या स्थानी आहेत. झिम्बाब्वेने आणखी एक विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो. नियमांनुसार, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बादफेरीसाठी पात्र ठरतील.

२००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला नमवले होते. त्या लढतीत ऑस्ट्रेलियाने १३८ धावा केल्या होत्या. अँड्यू सायमंड्सने ३३ तर ब्रॅड हॉजने ३५ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेतर्फे एल्टन चिगंबुराने ३ तर गॅरी ब्रेंटने २ बळी घेतले होते. ब्रेंडन टेलरच्या ६० धावांच्या बळावर झिम्बाब्वेने ५ गडी राखून हे लक्ष्य गाठले. व्हुसीमुसी सिंबादाने २३ तर हॅमिल्टन मासाकाटझाने २७ धावा करत ब्रेंडन टेलरला चांगली साथ दिली होती. त्यानंतर १९ वर्षांनंतर झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला नमवले आहे.

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ लढतींपैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. १९८३ वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने १३ धावांनी थरारक विजय मिळवला होता. २०१४ आणि अगदी अलीकडे म्हणजे २०२२ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.

ताज्या बातम्या

व्हिएतनामची कंपनी राज्यात साडेसहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शाश्वत नागरी विकास, औद्योगिक आणि पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात...