Friday, May 3, 2024
Homeक्रीडाआयसीसी महिला टी २० वर्ल्डकपचा थरार आजपासून

आयसीसी महिला टी २० वर्ल्डकपचा थरार आजपासून

आयसीसी महिला टी २० वर्ल्डकप (icc women’s world cup) स्पर्धेच्या आठव्या हंगामाच्या मुख्य फेरीला आज १० फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या उदघाटनाची सलामी लढत आज श्रीलंका (sri lanka) विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत (south africa) होणार आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा महिला वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं आहे. १० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला आहे १७ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण २३ सामने होणार आहेत. संघाची विभागणी २ गटात करण्यात आली आहे. प्रत्येक गटात ५ संघाचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिलांच्या तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा मानस असणार आहे .

- Advertisement -

आई मोठ्या भावालाच जास्त जीव लावते; १५ वर्षीय मुलाची पाचव्या मजल्यावरून उडी

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद सुने लुसकडे असणार आहे. तर श्रीलंकेचे कर्णधारपद चामारी अटापट्टू भूषवणार आहे. तिरंगी मालिकेतील विजयामुळे आपला विजयी सिलसिला कायम राखण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा प्रयत्न असणार आहे. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे.

Turkey-Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये मृत्यूतांडव! मृतांची संख्या २१ हजार पार

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १३ टी २० सामने झाले असून, यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने १० सामन्यात विजय संपादन केला आहे. ३ सामन्यात श्रीलंका विजयी झाली आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या