Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजICC Women's World Cup-2025 - दक्षिण आफ्रिकेला नमवून भारतीय महिला क्रिकेट संघ...

ICC Women’s World Cup-2025 – दक्षिण आफ्रिकेला नमवून भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता

नवी मुंबई

- Advertisement -

आयसीसी महिला विश्वचषक-२०२५चा अंतिम सामना आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला . दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या भारतीय सलामीवीर शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या. भारतीय संघाने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्व गडी बाद २४६ धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ५२ धावांनी विजय मिळवत आयसीसी महिला विश्वचषक-२०२५च्या चषकावर आपले नाव कोरले.

YouTube video player

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून शेफाली वर्मा व स्मृती मंधाना सलामीला फलंदाजीस आल्या.सामन्याच्या अठराव्या षटकात क्लो ट्रायॉनला गोलंदाजीवर सिनालो जाफ़्टाने स्मृती मंधानालाझेल बाद केले.स्मृती मंधानाने ५८ चेंडूत ४५ धावा केल्या. २८ व्या षटकात अयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर एस लूसने शेफाली वर्माला झेल बाद केले. शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या.

३० व्या षटकात अयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर लॉरा वोल्वार्डने जेमिमा रॉड्रिग्जला झेल बाद करत भारतीय संघाचा तिसरा गडी बाद केला. जेमिमा रॉड्रिग्जने ३७ चेंडूत ३४ धावा केल्या. ३९ षटकात हर्मनप्रीत कौरला म्लाबाने २९ धावांवर बाद केले. अमनज्योत कौरने १४ धावा करत नादिन डी क्लार्क करवी बाद झाली. ४९ व्या षटकात रिचा घोष २४ चेंडूत ३४ धावा करत अ‍ॅनेरी डेरकसेनकरवी झेल बाद झाली. अखेरच्या षटकात क्लो ट्रायॉनकरवी दीप्ती शर्मा झेल बाद झाली. दीप्ती शर्माने ५८ चेंडूत ५८ धावा केल्या. भारतीय महिला क्रिकेट संघाने ५० षटकाच्या अखेरीस ७ गडी बाद २९८ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून लॉरा वोल्वार्ड व टॅझमिन ब्रिट्स प्रथम फलंदाजीस आल्या. सामन्याच्या १० व्या षटकात अमनज्योत कौरने टॅझमिन ब्रिट्सला धाव बाद करत आफ्रिकेच्या संघास पहिला धक्का दिला.टॅझमिन ब्रिट्सने ३५ चेंडूत २३ धावा केल्या. १२ व्या षटकात नल्लापुरेड्डी चरणीने एनेके बॉशला शून्यावर बाद करत माघारी पाठविले. शेफाली वर्माने एस लूसला २५ धावांवर झेल बाद करत आफ्रिकेच्या संघास तिसरा धक्का दिला. मॅरिझॅन कॅप ४ धावांवर रिचा घोषने मॅरिझॅन कॅपला ४ धावांवर झेल बाद करत आफ्रिकेच्या संघाचा ४ थी खेळाडू बाद केली. सामन्याच्या ३० व्या षटकात राधा यादवने सिनालो जाफ्ताला १६ धावांवर झेल केले.४० व्या षटकात दीप्ती शर्माने अ‍ॅनेरी डेरकसेनला क्लीन बोल्ड केले. डेरकसेनने ३७ चेंडूत ३५ धावा केल्या.

सामन्याच्या ४२ व्या षटकात दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर अमनज्योत कौरने लॉरा वोल्वार्डला झेल बाद केले.लॉरा वोल्वार्डने ९८ चेंडूत १०१ धावा केल्या.दीप्ती शर्माने क्लो ट्रायॉनला ९ धावांवर पायचीत करत आफ्रिकेच्या संघाचा ८ खेळाडू बाद केला. ४५ व्या षटकात दीप्ती शर्माने अयाबोंगा खाकाला अवघ्या एक धावसंख्येवर झेल बाद केले.४६व्या षटकात हरमन प्रीत कौरने नादिन डी.क्लार्कला १८ धावांवर झेल बाद केले. ४६व्या षटकात आफ्रिकाच्या संघाने सर्व गडी बाद २४६ धावा केल्या.५२ धावांनी भारतीय संघ विश्वविजेता ठरला.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...