Friday, May 3, 2024
Homeनाशिकप्रांताच्या आदेशाला केराची टोपली ?

प्रांताच्या आदेशाला केराची टोपली ?

जानोरी । वार्ताहर Janori

गावठाण विस्तार योजनेंतर्गत जानोरी गावातील 37 नागरिकांना प्लॉट वाटप (Plot allotment) बाबत आदेश निर्गमित केलेले आहे. परंतू आजपर्यंत सदर नागरिकांना प्लॉटचा ताबा देण्यात आलेला नाही. या अनुषगाने मागील काही दिवसांपुर्वी काही नागरिकांनी उपोषण केले होते.

- Advertisement -

त्यात तहसीलदारांनी मध्यस्थी करुन उपोषणाची सांगता करुन प्रांत अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करुन संबंधित विभागाला कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशाकडे संबंधित अधिकार्‍यांनीच कानाडोळा केला आहे. त्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही कारवाई झाल्याचे दिसत नसल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर उपविभागीय अधिकार्‍यांच्या आदेशाला त्यांचेच प्रशासकीय अधिकारी केराची टोपली दाखवत असतील तर सर्व सामान्य नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दि. 12 ऑक्टोबर 1988 साली गावठाण विस्तार योजनेंतर्गत (Gaothan expansion schemes) जानोरी (janori) गावातील 37 नागरिकांना प्लाँटचे वाटप केले असून अद्यापपावेतो त्याचा ताबा नागरिकांना दिला नाही. पश्चिम कडील गट क्र. 1124/1 ची विक्री झाली असून त्याची विक्री संशयास्पद आहे. गट बाणगंगा नदीलगत (Banganga river) संपूर्ण पूर रेषेत असताना संबंधित बिल्डरकडून बांधकाम झाल्याने गावातील सुतारवाडा, मिटवाडी, वरचा कोळीवाडा आदी वस्त्यामध्ये पूराचे पाणी जावून जीवीत हानी होण्याची शक्यता असल्याच्या मागणीच्या अनुषंगाने दि. 20 स्पटेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजेपासून उपोषण सुरु केले होते.

त्या उपोषणाची दखल तहसीलदारांनी घेऊन गटविकास अधिकारी (Group Development Officer), उपअधिक्षक भुमी अभिलेख (Deputy Superintendent of Land Records), विस्तार अधिकारी तथा जानोरी प्रशासक, मंडळ अधिकारी मोहाडी, तलाठी (talathi) व ग्रामविकास अधिकारी ( Village Development Officer) जानोरी यांच्या समक्ष जावून उपोषणर्त्यांची भेट घेतली. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांनी गट क्र. 1124/1 व 2 चे क्षेत्रात स्थळ निरीक्षण करुन उपविभागीय अधिकारी नाशिक (nashik) यांच्याकडील आदेश क्र. गावठाण / वशी/ 1135 नाशिक दि. 12 ऑक्टोबर 1988 चे मुळसंचिकेमधील मोजणी नकाशा प्राप्त करुन घेवून उपअधिक्षक भुमी अभिलेख दिंडोरी यांना त्याप्रमाणे मोजणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

प्रशासक व ग्रामविकास अधिकार्‍यांना गट क्र. 1124/1 मधील संरक्षण भिंतीचे कामकाज आहे त्या परिस्थिती थांबवण्याबाबत संबंधित मिळकत धारकास लेखी सूचना देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मोजणी नकाशा व मुळसंचिका प्राप्त झाल्यानंतर संबंधितास पुढील कारवाई करण्याबाबतचे सूचना देण्यात आल्या व उपोषणकर्त्यांची समाधान करुन उपोषणाची सांगता करण्यात आली. त्यानंतर प्रांत अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी शक्ती सेना व जानोरी येथील 1124/2 मधील प्लाँट धारकांचे दि. 28 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करुन संंबंधित अधिकार्‍यांना कारवाईबाबत आदेश देण्यात आले.

उपोषण कर्त्यांच्या मागण्यांच्या झालेल्या कारवाईबाबत महिन्यात बैठका घेऊन झालेल्या कारवाईची माहिती देण्याबाबत आदेश झाला खरा परंतू महिना उलटूनही उपोषणकर्त्यांना त्यांच्या कारवाईबाबत कोणतीही हालचाल प्रशासकीय अधिकार्‍यांकडून होत नसल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी दर्शवित प्रांत अधिकारी दिंडोरी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असणार्‍या सुस्त अधिकार्‍यांवर कारवाई होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या