Tuesday, September 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआयआयटी मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई; प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांचे निलंबन

आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई; प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांचे निलंबन

मुंबई | Mumbai
आयआयटी मुंबईतील बीटेकच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने अखेर कठोर पाऊल उचललं आहे. आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांचे डीनपद तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. तसेच साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत यापूर्वी करण्यात आलेल्या विधानांबद्दल संस्थेने औपचारिक दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, तपास पूर्ण होण्यापूर्वी घटनेबाबत निष्कर्ष काढणे योग्य नव्हते, असे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. दरम्यान, संचालक शिरीष केदारे यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

साहिलवर गेल्या शुक्रवारी सेमिस्टर परीक्षेदरम्यान कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला होता. परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक असलेल्या प्रा. दुल्ला यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. आयआयटी-बॉम्बेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मयत विद्यार्थी साहिल वाकोडे याचे समुपदेशन करण्यात आले होते आणि कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न करता त्याला सोडण्यात आले होते.

- Advertisement -

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात; देशात १५ टक्के पावसाची तूट, महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांचे डीनपद निलंबित
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे यांनी प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना डीनपदावरून तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. पुढील कारवाई तपासाच्या निष्कर्षांनुसार केली जाईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी दुल्ला यांच्या निलंबनासह विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या. त्यानंतर संस्थेकडून ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, प्रा. दुल्ला यांच्याविरोधात साहिलच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत साहिलला कथित मानसिक त्रास आणि जातीय स्वरूपाच्या अपमानास्पद वक्तव्यांना सामोरे जावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची सत्यता सध्या तपासाचा विषय आहे. प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

आयआयटी बॉम्बेकडून दिलगिरी व्यक्त
आयआयटी बॉम्बेने एका अधिकृत निवेदनाद्वारे आपल्या आधीच्या भूमिकेवरून माघार घेतली आहे. “साहिलच्या दुर्दैवी निधनाबाबतच्या परिस्थितीविषयी आम्ही आधी केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागतो,” असे संस्थेने म्हटले आहे. पुढे स्पष्ट करण्यात आले की, “या घटनेमागील परिस्थितीचा तपास योग्य प्राधिकरणांकडून सुरू आहे. तपास पूर्ण होण्याआधीच घटनेची माहिती आणि तपशील प्रसिद्ध करणे किंवा त्यावर भाष्य करणे अयोग्य होते.”

दुसऱ्या बाजूला, ‘आयआयटी बॉम्बे फॅकल्टी फोरम’ने प्रा. सुर्यनारायण दुल्ला यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रा. दुल्ला हे केवळ संस्थेच्या नियमावलीनुसार (Academic Policies) आपले कर्तव्य बजावत होते. परीक्षेत विद्यार्थ्याकडे अनधिकृतपणे मोबाईल आढळल्याने त्यांनी नियमानुसार पुढील कारवाईसाठी त्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली होती.” या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच, केवळ कर्तव्य पार पाडणाऱ्या सहकाऱ्याची प्रतिमा मलिन केली जात असल्याबद्दल फोरमने चिंता व्यक्त केली आहे.सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस आणि गुन्हे शाखेकडून सखोलपणे सुरू आहे.

ताज्या बातम्या

Mangesh Chivate : पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेचे इच्छुक उमेदवार चिवटे...

0
पुणे | Pune पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महायुतीतून पुणे शिक्षक मतदारसंघाची (Pune Teachers...