Wednesday, September 30, 2026
Homeक्राईमAkole : ब्राम्हणवाड्यात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा

Akole : ब्राम्हणवाड्यात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा

एलसीबीच्या धडक कारवाईत 10 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने 4 ऑगस्ट रोजी दारूविक्रीविरोधात धडक कारवाई करत चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण 10 लाख 52 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक अकोले पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसायांची माहिती घेऊन कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते.

- Advertisement -

4 ऑगस्ट रोजी पथक अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना ब्राम्हणवाडा येथील ब्राम्हणवाडा-बोटा मार्गावरील स्वामी समर्थ क्वा शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये अनिष बाबू पटेल हा बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अनिष बाबू पटेल (वय 58), नदीम याकुब पटेल (वय 31) आणि नाजीम पटेल (वय 31), सर्व रा. ब्राम्हणवाडा, ता. अकोले यांना ताब्यात घेतले.
पंचासमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत आरोपींकडून 49 हजार 170 रुपयांच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या, 51 हजार 330 रुपयांचे दोन मोबाईल, 600 रुपये रोख, 1 लाख रुपयांची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी आणि 8 लाख 50 हजार रुपयांची हुंडाई कंपनीची एमएच-17-जेए-4946 क्रमांकाची कार एकूण 10 लाख 51 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 508/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत. याच कारवाईदरम्यान ब्राम्हणवाडा येथील हॉटेल सम्यक येथे उत्तम आनंद शिंदे 34, रा. ब्राम्हणवाडा) हा बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1 हजार 790 रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 507/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके, योगेश कर्डिले आणि आदिनाथ पाखरे यांनी केली.

ताज्या बातम्या

default-featured-image

Rohit Pawar : गृहखात्याचा पोलिसांवर वचक राहिला नाही; रोहित पवारांचा राज्य...

0
नाशिक | Nashik राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) परिस्थिती गंभीर बनली असून, गृहखात्याचा पोलिस (Police) प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही, असा आरोप राष्ट्रवादी...